येथील फिन्ले मिल तीन ते चार वर्षांपासून बंद असल्याने अनेक कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. कामगारांनी त्रस्त होऊन आत्महत्या केल्या आहेत. अशा परिस्थितीतही एनटीसी प्रशासन कुठलीच कारवाई करत नसल्याने फिन्ले मिल कामगार मनोज रामसिंग सूर्यवंशी व विकेश नरे
.
चार दिवस या कामगारांनी चिमणीवर चढत केलेल्या आंदोलना नंतर आ. प्रवीण तायडे यांनी आक्रमक भूमिका घेत मुंबई येथील एनटीसी अधिकाऱ्यांना अचलपूर येथे बोलावून कार्यरत असलेल्या कामगारांचे दोन महिन्यांचे वेतन तत्काळ करण्याबाबत लेखी आश्वासन घेतले. याला दोन महिने उलटले तरी अद्याप कामगारांना बोनस तर सोडाच वेतनही मिळाले नसल्याने पुन्हा गुरुवार, ७ ऑगस्टला कामगारांनी चिमणीवर चढून आंदोलन सुरू केले. फिन्ले मिलने थकवलेल्या वेतनामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या कामगारांनी आज पुन्हा एकदा मिलच्या चिमणीवर चढून आंदोलनाचा पवित्रा घेतला. दैनंदिन गरजा भागवणेही अवघड झाल्याने संतप्त झालेल्या काही कामगारांनी चिमणीवर चढून व्यवस्थापनाविरुद्ध घोषणाबाजी केली. तत्काळ वेतन द्या, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला. दोन महिने उलटून गेले तरी पगाराचा पत्ता नाही. व्यवस्थापनाकडे वारंवार मागणी करूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याने हे टोकाचे पाऊल उचलावे लागल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. फिन्ले मिलमधील वेतनप्रश्नी वारंवार निर्माण होणाऱ्या अशा गंभीर घटनांमुळे कामगारांच्या सुरक्षिततेचा व आर्थिक शाश्वतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कामगार संघटनांनी शासन आणि व्यवस्थापनाकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली असून, कामगारांचा संयम सुटण्याआधी न्याय दण्याचीही मागणी होत आहे.