Dharashivs Crime News: धाराशिवमधील नळदुर्ग बसस्थानकावरील एक धक्कादायक घटना मोबाईल कॅमेरामध्ये कैद झाली झाली आहे. एसटी स्थानकावर पॉर्न व्हिडीओ पाहत अश्लील हावभाव करत असलेल्या एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेली व्यक्ती मौलवी असल्याचं सांगितलं जात आहे. हादरवून टाकणारी बाब म्हणजे बसस्थानकात भर गर्दीच्या ठिकाणी महिला व शाळकरी मुलीसमोर पॉर्न व्हिडीओ लावून अश्लील हावभावामुळे संतापाची लाट पसरली आहे.
कोणी केली तक्रार?
मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिवमधील नळदुर्ग येथील बसस्थानकावर हा सारा प्रकार घडला आहे. मोबाईलवर पॉर्न व्हिडिओ पाहणाऱ्या मौलवीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामध्ये सुनिल माणिकराव गव्हाणे यांनी तक्रार दाखल केली आहे. या फिर्यादीवरून मौलवीवर कारवाई करण्यात आली आहे.
कठोर कारवाईची मागणी
अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव कासीम अब्दुल रहीम इनामदार असं आहे. आरोपी विरोधात भारतीय न्याय संहीता 2023 च्या कलम 294(1), 294(2) व 296 अन्वये गुन्हा करण्यात दाखल करण्यात आला आहे. पोलीस मात्र यावर काहीही बोलायला तयार नाहीत. मात्र अशाप्रकारे सार्वजनिक ठिकाणी अश्लील व्हिडीओ पाहण्याचे प्रकार घडत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी या प्रकरणात कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.
बहिणीच्या मदतीने शेजारच्या महिलेचा छळ
नाशिकमध्ये दोन दिवसांपूर्वीच अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत बहिणीच्या मैत्रिणीचा छळ केल्याचा प्रकार समोर आला होता. नाशिकच्या इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका विवाहितेवर तिच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने बहिणीच्या माध्यमातून जवळीक निर्माण करत मैत्री व प्रेमाचा बनाव करून विश्वासात घेत शारीरिक संबंध ठेवले. या महिलेसोबत शरीरसंबंध ठेवतानाचे अश्लील फोटो, व्हिडीओ आरोपीने काढून घेतले. ते व्हायरल करण्याची धमकी देत सातत्याने मागील दोन वर्षे वेळोवेळी नाशिक शहरासह मुंबई, अलिबाग आदी ठिकाणी घेऊन जात शारीरिक संबंध प्रस्थापित करत लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटनाक्रम या महिलेने सांगितला आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार दोन्ही संशयित पुरुषांसह एका महिलेविरुद्ध इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी पीडित महिला ही मागील पाच वर्षांपासून इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास आहे.
नेमकं घडलं काय?
2020 साली तिच्या राहत्या घराशेजारी एका कुटुंबाने भाडेतत्त्वावर घर घेतले होते. या कुटुंबातील व्यक्तीने तिच्या बहिणीच्या माध्यमातून पीडितेसोबत ओळख वाढविली. बहिणीला विश्वासात घेत कट रचून पीडितेच्या घरी ये-जा वाढवून सलोख्याचे व मैत्रीपूर्ण जिव्हाळ्याचे संबंध दोन्ही कुटुंबांमध्ये असल्याचा बनाव केला. पीडित विवाहितेचे पती घरी नसताना त्यांच्या घरी स्वतःहून जात पीडितेसोबत विश्वास निर्माण करून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची व पतीला पाठविण्याची धमकी आरोपी व्यक्तीने व त्याच्या बहिणीने दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पीडितेला तिच्या पतीविरुद्ध नकारात्मक माहिती सांगून भीती घालून संशयित अनिल नामक व्यक्तीने वेळोवेळी शारीरिक अत्याचार केला. तसेच तिचा मानसिक छळ केल्याप्रकरणी अनिलची बहीण व नातेवाईक असलेला राजेंद्र नामक व्यक्तीवर अखेर इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
FAQ
धाराशिवमधील बसस्थानकावर नेमकं काय घडलं?
धाराशिवमधील नळदुर्ग बसस्थानकावर एका व्यक्तीने, ज्याला मौलवी असल्याचे सांगितले जाते, मोबाईलवर अश्लील व्हिडीओ पाहताना आणि अश्लील हावभाव करताना पाहिले गेले. ही घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आणि व्हायरल झाल्याने संतापाची लाट पसरली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
या प्रकरणात कोणाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे?
आरोपीचे नाव कासीम अब्दुल रहीम इनामदार आहे. त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 च्या कलम 294(1), 294(2) आणि 296 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाची तक्रार कोणी केली?
सुनिल माणिकराव गव्हाणे यांनी नळदुर्ग बसस्थानकावरील या घटनेची तक्रार दाखल केली, ज्याच्या आधारावर पोलिसांनी कारवाई केली.