Indias first AI Anganwadi: जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्सने आपला दबदबा कायम ठेवलाय. एआयमुळे अनेक कामे सोपी होऊ लागली आहेत. यात भारतही मागे नाहीय. भारतात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानाने सुसज्ज पहिली अंगणवाडी सुरू झालीय. यामुळे शिक्षण क्षेत्रात एक नवा अध्याय रचला गेलाय.. ही अंगणवाडी भारतातील महाराष्ट्रातील नागपूर शहरापासून अवघ्या 18 किलोमीटर अंतरावर असलेल्या वडधमना या छोट्याशा गावात सुरू झाली आहे.
पाटी आणि पेन्सिलचे रुपांतर कशात?
देशातील उच्च शिक्षणात AI ची सुरुवात होत असतानाच, आता लहान मुलांचे शिक्षणही डिजिटल युगात पाऊल ठेवत आहे. या अंगणवाडीने पारंपरिक शिक्षणपद्धतीला छेद देत इंटरॅक्टिव्ह डिजिटल लर्निंगचा अवलंब केलाय. नागपूर जिल्हा परिषदेच्या ‘मिशन बाल भरणारी’ योजनेंतर्गत ही AI-पावर्ड आंगणवाडी सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमाने पारंपरिक पाटी आणि पेन्सिलच्या शिक्षणाला इंटरॅक्टिव्ह डिजिटल लर्निंगमध्ये रूपांतरित केलंय.
शिक्षणात काय झाला बदल?
यामुळे लहान मुलांचे शिक्षण अधिक रंजक आणि प्रभावी झालंय. स्मार्ट बोर्ड, टॅबलेट्स आणि व्हर्च्युअल रियालिटी (VR) यांसारख्या अत्याधुनिक साधनांचा वापर करून मुलांना खेळासारखे शिक्षण दिले जात आहे. याचा परिणाम म्हणून या आंगनवाडीत मुलांची उपस्थिती दुप्पट झाली आहे. आता नागपूर जिल्ह्यातील 40 इतर आंगनवाड्यांमध्येही हा मॉडेल राबवण्याची योजना सरकारने आखली आहे.
AI आंगणवाडीची वैशिष्ट्ये काय?
वडधमना येथील ही आंगणवाडी आता पूर्णपणे डिजिटल युगात प्रवेश करतेय. येथे पाटी आणि पेन्सिलच्या जागी आता स्मार्ट बोर्ड, टॅबलेट्स आणि व्हर्च्युअल रियालिटी हेडसेट्स यांचा वापर होतोय. या तंत्रज्ञानामुळे मुलांचे शिक्षण खेळासारखे आणि आनंददायी झालंय. यामुळे मुलांचा शिक्षणातील रस वाढला असून, त्यांची एकाग्रता आणि शिकण्याची गतीही सुधारल्याची माहिती शिक्षक देतात.
मुलांच्या उपस्थितीत लक्षणीय वाढ
AI तंत्रज्ञानाच्या वापरामुळे या आंगणवाडीत मुलांच्या उपस्थितीत मोठी वाढ झालीय. सुरुवातीला येथे फक्त 10 मुले नियमित येत होती. मात्र, AI तंत्रज्ञानाच्या समावेशानंतर आता दररोज 25 हून अधिक मुले येथे येत आहेत. डिजिटल गॅझेट्सच्या वापरामुळे मुलांचे लक्ष अधिक केंद्रित झाले आहे आणि त्यांची शिकण्याची प्रक्रिया जलद झाली आहे. यामुळे पालकांमध्येही या आंगनवाडीबद्दल उत्साह वाढला आहे.
कसे आहे हे AI शिक्षण?
पारंपरिक ब्लॅकबोर्डच्या जागी स्मार्ट बोर्डवर इंटरॅक्टिव्ह धडे शिकवले जातात. मुलांना वैयक्तिकरित्या डिजिटल सामग्रीद्वारे शिकण्याची संधी मिळते.VR हेडसेट्सद्वारे मुलांना वास्तववादी आणि रंजक शिक्षणाचा अनुभव मिळतो.
यामुळे शिक्षण केवळ पुस्तकी न राहता, प्रत्यक्ष आणि अनुभवात्मक बनले आहे
भविष्यातील योजना काय?
नागपूर जिल्हा परिषदेच्या या यशस्वी प्रयोगानंतर आता सरकारने हा मॉडेल जिल्ह्यातील 40 इतर आंगणवाड्यांमध्ये राबवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ग्रामीण भागातील लहान मुलांना अत्याधुनिक शिक्षणाची संधी मिळेल आणि त्यांचेभविष्य घडवण्यात मोठी मदत होणार आहे.
भारतातील पहिली AI अंगणवाडी कोठे सुरू झाली आहे?
भारतातील पहिली AI-पावर्ड अंगणवाडी महाराष्ट्रातील नागपूर शहरापासून 18 किलोमीटर अंतरावर असलेल्या वडधमना या गावात सुरू झाली आहे.
AI अंगणवाडी कोणत्या योजनेंतर्गत सुरू झाली आहे?
ही अंगणवाडी नागपूर जिल्हा परिषदेच्या ‘मिशन बाल भरणारी’ योजनेंतर्गत सुरू करण्यात आली आहे.
AI अंगणवाडीत कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत?
या अंगणवाडीत स्मार्ट बोर्ड, टॅबलेट्स, आणि व्हर्च्युअल रियालिटी (VR) हेडसेट्स यांसारख्या अत्याधुनिक सुविधांचा वापर केला जात आहे.