30 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक

आज (५ ऑगस्ट) पुत्रदा (पवित्रा) एकादशी आहे. श्रावण, एकादशी आणि मंगळवार यांच्या योगामध्ये भगवान शिव, श्रीहरी तसेच मंगळ आणि हनुमानजींची पूजा करण्याचे शुभ संयोजन आहे. श्रावणात शिवपूजेचे स्वामी श्रीहरी आहेत, मंगळवारचा स्वामी ग्रह मंगळ आहे आणि हनुमान यांनी मंगळवारी अवतार घेतला होता. म्हणूनच आज या चार देवांची पूजा करा.
उज्जैनचे ज्योतिषी पंडित मनीष शर्मा यांच्या मते, श्रावण शुक्ल एकादशी किंवा पुत्रदा एकादशीचे व्रत केल्याने मुलांशी संबंधित समस्या दूर होतात. मुलांच्या सुखी भविष्याच्या कामनासह हे व्रत केले जाते. एकादशीच्या व्रतात दिवसभर अन्नाशिवाय राहावे लागते. ज्यांना उपाशी राहणे शक्य नसेल ते फळे आणि दूध सेवन करू शकतात.
एकादशीला उपवास आणि विष्णूची पूजा केल्याने जाणूनबुजून किंवा अजाणतेपणे केलेल्या सर्व पापांपासून मुक्ती मिळते. भक्ताचे दुःख दूर होते आणि त्याला त्याच्या कार्यात यश मिळते. स्कंद पुराणात एकादशीचे व्रत सांगितले आहे. भगवान श्रीकृष्णाने पांडव युधिष्ठिराला वर्षातील सर्व एकादशींचे महत्त्व सांगितले होते.
श्रावण, मंगळवार आणि एकादशीच्या निमित्ताने तुम्ही हे शुभ कार्य करू शकता
- एकादशीला प्रथम गणेशाची पूजा करावी. गणेशाला 21 दुर्वा अर्पण करा, उदबत्ती लावा आणि ऊँ गं गणपतये नमः या मंत्राचा जप करा. शिवलिंगाचा अभिषेक करावा. बिल्वपत्र, धोत्रा आणि रुईची फुले अर्पण करा. धूप आणि दिवे लावून आरती करावी. ऊँ नमः शिवाय या मंत्राचा जप करा.
- भगवान विष्णूंसोबत महालक्ष्मीचा अभिषेक करा. दक्षिणावर्ती शंखात केशर मिसळलेले दूध भरा आणि देवाच्या मूर्तींना स्नान घाला. त्यानंतर पाण्याने स्नान घाला. पूजेमध्ये फळे, फुले, गंगाजल, धूप आणि प्रसाद इत्यादी अर्पण करा. तुळशीसोबत मिठाई अर्पण करा. आरती करा. पूजेमध्ये विष्णूजींच्या मंत्राचा ऊँ नमो भगवते वासुदेवायचा किमान १०८ वेळा जप करा.
- एकादशीचे व्रत करणाऱ्यांनी दिवसातून एकदा फळे खावीत. दिवसभर भगवान विष्णूची पूजा करावी. भगवान विष्णूंच्या कथा वाचाव्यात आणि ऐकाव्यात. दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला गरजू व्यक्तीला जेवण द्यावं, दक्षिणा द्यावी. त्यानंतर स्वतः जेवण करावं. अशा प्रकारे एकादशीचे व्रत पूर्ण होते.
- मंगळवारी आणि एकादशीला हनुमानजींसमोर धूप आणि दिवे लावा आणि हनुमान चालीसा पठण करा. भगवान रामाची पूजा करा. ऊँ रामदूताय नम: या मंत्राचा किमान १०८ वेळा जप करा.
- ज्यांच्या कुंडलीत मंगळ ग्रहाशी संबंधित दोष आहेत त्यांनी मंगळवारी शिवलिंगावर लाल गुलाल आणि लाल मसूर अर्पण करावे. मंगळाची पूजा शिवलिंगाच्या रूपात केली जाते, म्हणून मंगळ दोष दूर करण्यासाठी शिवपूजा करावी.

[ad_3]
Source link