सन १९९४ पासून देशभरात लघु व मध्यम व्यापारी, उद्योजकांना सोबत घेऊन राष्ट्रीय विकासात मोठे योगदान देणारी ‘लघुउद्योग भारती’ ही लघु व मध्यम उद्योजकांच्या समस्यांच्या निराकरणासाठी कटिबद्ध असल्याचे मत महाराष्ट्र राज्य लघुउद्योग भारतीचे प्रदेश प्रभारी बलदेव
.

येथील हॉटेल रायझिंग सन सभागृहात रविवारी लघुउद्योग भारतीचे उद्योजक संमेलन व महाराष्ट्र राज्य लघुउद्योग भारतीची त्रैमासिक बैठक झाली. लघुउद्योग भारतीचे अकोला शाखाध्यक्ष पंकज बियाणी यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या संमेलनात लघुउद्योग भारतीचे शाखा उपाध्यक्ष पवन माहेश्वरी, संदेश खंडेलवाल, सहसचिव गुरुमुख पारवाणी, कोषाध्यक्ष मनोज शाह, प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र सोनवणे, माजी प्रदेशाध्यक्ष रवींद्र वैद्य, प्रदेशाध्यक्ष अमित घैसास, प्रदेश महामंत्री हरीश हांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आपल्या मार्गदर्शनात बलदेव प्रजापत यांनी लघुउद्योग भारतीच्या सेवा कार्याची माहिती दिली. ते म्हणाले, की लघुउद्योग भारतीचे देशभरात सातशे शाखा व साठ हजार सदस्य असून, देशभरातील लघु व मध्यम व्यापाऱ्यांच्या समस्यांच्या निराकारणासाठी ही संस्था कार्यरत असल्याचे सांगितले. लघुउद्योग भारतीचे माजी प्रदेशाध्यक्ष रवींद्र वैद्य यांनी यावेळी राष्ट्रीय उद्योग धोरणात लघुउद्योग भारतीचे मोठेयोगदान असून, राज्य व केंद्राच्या व्यापार उद्योग धोरणात लघुउद्योग भारती सातत्याने महत्त्वपूर्ण भूमिका निभावत असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमात स्थानीय वरिष्ठ उद्योजक हरीशभाई शाह तथा ज्येष्ठ उद्योजक पुरुषोत्तम गुप्ता यांनी आपले मनोगत व्यक्त करत लघुउद्योग भारतीच्या सेवा कार्याची प्रशंसा केली. संमेलनात अकोला शाखेची नवीन ३१ सदस्य यावेळी जोडण्यात आले.
प्रास्ताविक अकोला शाखेचे अध्यक्ष पंकज बियाणी यांनी करून अकोला शाखेने केलेल्या औद्योगिक व व्यापरिक कार्याची माहिती दिली. या संमेलनात उद्योजक व व्यापारी वर्गाने उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अकोला शाखेचे सचिव अमित सराफ यांनी केले. विभागीय सदस्य महेंद्र तरडेजा यांनी आभार मानले.
या एकदिवसीय संमेलनाच्या यशस्वीतेसाठी लघु उद्योग भारतीचे प्रदेश उपाध्यक्ष आशिष चंदाराणा, अकोला शाखेचे कार्यकारी सदस्य रोहित मालपाणी,रितेश गुप्ता, सुनील खंडेलवाल, अविनाश भाला, मधुर बियाणी, नवीन अग्रवाल मूर्तिजापूर, अमित पडगिलवार, मित्तल पटेल, गिरीश मुलानी, संजय श्रावगी, विवेक बिजवे,रुपेश राठी, सुमित कोरडे आदींनी परिश्रम घेतले. यावेळी अकोला इंडस्ट्रीज असोसिएशन, डाळ मिल असोसिएशनसमवेत प्रदेश व जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य व राज्यभरातून आलेले व्यापारी, उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रीय उद्योग व्यापार धोरण ठरवण्यास हातभार लघु उद्योग भारतीच्या माध्यमातूनच राष्ट्रीय उद्योग व्यापार धोरण ठरवण्यास हातभार लागत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या संमेलनात लघुउद्योग भारतीचे सदस्य अभियान, व्यापार, उद्योग धोरण,एमएमएमई यावर विचार व्यक्त करण्यात आले. तसेच तसेच ही संस्था लोक भावनेने राष्ट्रीय कार्यात सहभागी होऊन राष्ट्रहित जोपासत असून व्यापार उद्योग विश्वातील पॉलिसी मेकिंग मध्ये सातत्याने सहकार्य करत असल्याची बाबही यावेळी विशद करण्यात आली.