तंबाखू, खर्रा, मद्यपान, अमली पदार्थांच्या सेवनामुळे पुरुषांमध्ये वंध्यत्वाचे प्रमाण वाढत चालले असून आजमितीस ते ३० वरून ६०% पर्यत वाढल्याची माहिती महाराष्ट्र आयव्हीएफ संघटनेचे सरचिटणीस आणि नागपुरातील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. चैतन्य शेंबेकर यांनी “
.
३० वर्षांपूर्वी ७०% महिला व ३०% पुरुषांमध्ये वंध्यत्व हाेते. आताच्या काही अभ्यासानुसार पुरुषांमध्ये वंध्यत्वाचे ६०% पर्यत गेले आहे. महाराष्ट्रात तंबाखू व खर्रा सेवन खूप जास्त आहे. स्पर्मसाठी दोन्ही गोष्टी जास्त घातक आहे. तंबाखूच्या सेवनामुळे वंध्यत्वाची समस्या उद्धवते. तंबाखूमध्ये असलेले घटक पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी करू शकतात, तर महिलांमध्ये अंडपेशींच्या निर्मितीवर आणि त्यांच्या गुणवत्तेवर परिणाम करू शकतात. यामुळे गर्भधारणेमध्ये अडचणी येऊ शकतात किंवा वंध्यत्वाची समस्या निर्माण होऊ शकते.
एलिट क्लासमध्ये ड्रग, लठ्ठपणा व जिममध्ये घेतले जाणारे ॲनाबोलिक स्टेरॉइडचे इंजेक्शन घातक ठरते. स्नायू उठावदार व पिळदार दिसण्यासाठी जिममध्ये इंजेक्शन घेतले जाते. दहा वर्षात तरूण मुलांमध्ये ३० ते ४० टक्क्यांनी वंध्यत्व वाढले. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार देशाचा प्रजनन क्षमता दर म्हणजेच फर्टिलिटी रेट शहरी भागात १.६ वर तर ग्रामीण भागात २.१ वर आला आहे.
स्त्री आणि पुरुषांसाठी टेस्ट महत्त्वपूर्ण
मेडिकल फील्डमधील अनुभवानुसार, बऱ्याचदा असे दिसून येते कि, महिलांच्या खूप साऱ्या तपासण्या केल्या जातात; परंतु पुरुषांची एकही तपासणी झालेली नसते. यामुळे जोडप्यांचा वेळ आणि पैसे वाया जातात. २० वर्षांपूर्वी पुरुषांमध्ये अहंकार खूप होता. पुरूष प्रधान संस्कृतीचा पगडा होता. लग्नाच्या आधीपण दोघांनी फर्टिलिटी तपासली पाहिजे. आताही फक्त १० टक्के पुरूष टेस्ट करतात. शहरी भागात याविषयी जागृती येत असली तरी ग्रामीण भागात अजूनही पुरूषी मानसिकता आणि अहंकार कायम आहे. लवकर रिझल्ट हवा असल्यास फर्टिलिटी ट्रिटमेंट सुरु करण्यापूर्वी स्त्री-पुरुष दोघांचीही तपासणी महत्त्वाची ठरते.
नवविवाहितांनी वयाच्या तिशीच्या आत मूल होऊ देणे अत्यंत गरजेचे
यावर नवविवाहितांनी तिशीच्या आत मूल होऊ देणे गरजेचे असल्याचे डॉ. चैतन्य शेंबेकर म्हणाले. आई होण्याचं योग्य वय २५ ते ३० असल्याचे शेंबेकर यांनी स्पष्ट केले. आमच्याकडे आयव्हीएफसाठी येणाऱ्या पेशंटच्या डिम्बग्रंथी (Ovarian reserve) ३० वर्षांच्या वयात कमी झाले असतात. ३२ वर्षांपर्यंत तर ते अगदीच कमी झालेले असतात. आपण आता पाश्चिमात्य देशांचे अनुकरण करीत करिअरवर भर देतो. पण. त्याहीपेक्षा ३० च्या आत पहिले मूल होऊ देणे चांगले आहे, असे डाॅ. चैतन्य शेंबेकर म्हणाले. महिलांमध्ये ३० नंतर आणि पुरुषांमध्ये साधारण ४० वयानंतर प्रजनन क्षमता कमी होत जाते हे लक्षात घेतले पाहिजे.
अमली पदार्थ : २०५० पर्यंत भारताचा संपूर्ण प्रजनन दर म्हणजेच टोटल फर्टिलिटी रेट १.२९ वर येण्याची शक्यता आहे. तंबाखू, खर्रा यासह अमली पदार्थांचे सेवन कारणीभूत असल्याचे डॉ. चैतन्य शेंबेकर यांनी सांगितले. भारतासह राज्यात वंध्यत्व एखाद्या साथीसारखे पसरत चालले आहे. प्रत्येक सहापैकी एका जोडप्याला वंध्यत्वाच्या समस्येने ग्रासलेले आहे.