चिखलदरा-मोथा मार्गावर अपघात: क्रुझर आणि टाटा नेक्सन कारच्या धडकेत शेगावचे तीन पर्यटक जखमी – Amravati News


चिखलदरा-मोथा मार्गावर धर्मशक्ती पॉईंटजवळ सोमवार, ४ ऑगस्टला एक अपघात घडला. या अपघातात शेगावचे तीन पर्यटक जखमी झाले. क्रुझर आणि टाटा नेक्सन कार यांच्यात समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाला.

.

अपघातात क्रुझर वाहनातील शेख मुस्तकीन (१०), अफरोज खान (२३) आणि अशीका जमील (२) हे शेगांव येथील पर्यटक जखमी झाले. त्यांना किरकोळ दुखापती झाल्याने स्थानिक ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.

क्रुझर क्रमांक एमएच २८ व्ही ७०८६ आणि टाटा नेक्सन कार क्रमांक एमएच २७ डीयु ६८३७ या दोन वाहनांमध्ये ही धडक झाली. अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती.

चिखलदरा पर्यटनस्थळी येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांची गर्दी आता नेहमीची बाब झाली आहे. घाट वळणाच्या या रस्त्यावर वाहन सावधगिरीने चालविणे आवश्यक असते. तरीही काही पर्यटक भरधाव वाहने चालवून अपघातास कारणीभूत ठरतात.

अपघाताची माहिती मिळताच चिखलदरा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24