मोबाईल न मिळाल्याने 16 वर्षांच्या मुलाची आत्महत्या: छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना, तज्ञांनी केली चिंता व्यक्त – Chhatrapati Sambhajinagar News



छत्रपती संभाजीनगरमध्ये आईने मोबाईल दिला नाही म्हणून एका 16 वर्षांच्या मुलाने खवड्या डोंगरावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. अशा क्षुल्लक कारणांमुळे तरुणांमध्ये आत्महत्येचे प्रमाण वाढत असल्याने पालकांसमोर मोठी चिंता निर्माण झाली आहे.

.

छत्रपती संभाजीनगरमध्ये आईने मोबाईल देण्यास नकार दिल्याने एका 16 वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील हा तरुण आपल्या कुटुंबासोबत संभाजीनगरच्या वाळूज परिसरात राहत होता आणि पोलीस भरतीची तयारी करत होता. त्याने आईकडे मोबाईलची मागणी केली होती, मात्र “आत्ता मोबाईल नको” असे सांगितल्याने तो नाराज झाला.

याच रागातून त्याने शहराच्या जवळील खवड्या डोंगर गाठला आणि तिथून उडी मारली. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पुढील तपास सुरू केला आहे. अशा क्षुल्लक कारणांवरून होणाऱ्या आत्महत्यांमुळे समाजात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

या प्रकारानंतर पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी आवाहन केले की, पालकांनी आपल्या मुलांना समजून घेणे गरजेचे आहे. मुलांमध्ये आलेली अस्थिरता, निर्णय घेण्याची घाई आणि तात्कालिक रागाचे परिणाम खूप गंभीर होऊ शकतात. पालकांनी संवाद वाढवावा, मुलांच्या भावना समजून घ्याव्यात.

मानसोपचार तज्ञ डॉ. संदीप शिसोदे यांनी गंभीर दखल घेतली आहे. ते म्हणाले, गेल्या काही वर्षांपासून मोबाईलचे आकर्षण इतके प्रचंड वाढले आहे की, मानसोपचार विभागात येणाऱ्या दहा केसेसपैकी नऊ केसेस या मोबाईलशी संबंधित असतात. मोबाईल मिळत नाही म्हणून मुले नैराश्यात जातात, चिडचिड करतात आणि काही वेळा जीवघेणे पाऊल उचलतात.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24