पुण्यातील कोथरूड पोलिस ठाण्यात 3 दलित तरुणींचा छळ झाल्याच्या आरोपामुळे वातावरण तापले आहे. या तरुणींनी पोलिसांवर जातीवाचक शेरेबाजी, विनयभंग व शाब्दिक लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप केला आहे. यासंबंधी पीडित मुलीने दिलेली तक्रार समोर आली आहे. त्यात या
.
पीडित तरुणीच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी आम्हा तिघींनाही कोथरूड पोलिस स्टेशनच्या वरच्या मजल्यावरील एका रुममध्ये ठेवले. यावेळी त्यांनी मला माझे आडनाव विचारले. तुझे आडनाव काय? मग तू अशीच वागणार असे पोलिस म्हणाले. यावेळी एक महिला पोलिस अधिकारी म्हणाली, की तुझा स्वभाव असाच राहिला, तर कुणीतरी तुला असेच मारून टाकेल. तुझा खून होईल. तू अशी जिवंत राहूच शकत नाहीस. त्यामुळे मी कुटुंबीयांपासून इथे लांब (पुण्यात) एकटी राहते. या धमकीमुळे मला आता सतत भीती वाटत आहे.
पीडित तरुणी आपल्या तक्रारीत पुढे म्हणते, एकट्या राहत अशाच मोकाट सुटल्यात. किती पोरांसोबत झोपते? तुझ्या रुमवर पोरं झोपायला येतात का? तुझी व तुझ्या मैत्रिणींची ओढणी एकाच रंगाची आहे. तुम्ही लेस्बियन दिसत आहात. तुम्हाला पाहूनच वाटत आहे की, तुम्ही एलजीबीटीक्यू समुदायाच्या आहात असे विविध आरोप करून माझे आळीपाळीने शाब्दिक लैंगिक शोषण करण्यात आले.
पोलिसांनी डोळ्यांनी माझे शरीरच स्कॅन केले
तुला बाप नाही. फक्त माय आहे. तू पगाराचे पैसे घरी देतेस का? की त्यांनीही तुला वाऱ्यावर सोडले आहे? पोलिसांनी चौकशीशी काहीच संबंध नसल्याची वाक्य बोलून मला टॉर्चर केले. यावेळी काही पुरुष पोलिस सतत माझे शरीर न्याहाळत होते. जणू काही ते डोळ्यांनी माझे शरीरच स्कॅन करत होते. महिला पोलिसही सतत निरीक्षण करत होत्या. एक पोलिस अधिकारी तर चक्क माझ्या अंगावर धावून आला. त्याचा हाता, खांद्याचा व हनुवटीचा घाणेरडा स्पर्श मला झाला. एका प्रकरणात केवळ चौकशीसाठी मला ठाण्यात आणले असता त्या पोलिस अधिकाऱ्याने मला गाल व पाठीवर गुद्दे व चापटा मारल्या. कंबर व पायावरही लाथा मारल्या, असा आरोपही सदर तरुणीने आपल्या तक्रारीत केल्याचा दावा एबीपी माझाने आपल्या वृत्तात केला आहे.
आत्ता पाहू काय आहे प्रकरण?
छत्रपती संभाजीनगर येथील एक 23 वर्षीय विवाहिती महिला पतीच्या छळाला कंटाळून पुण्यात आली होती. ती तिथे आपल्या मैत्रिणींसोबत राहत होती. पुणे पोलिसांनी या मुलीला मदत करणाऱ्या 3 मुलींना कोणतीही पूर्वसूचना न देता ताब्यात घेतले. यावेळी त्यांना कोथरूड पोलिस ठाण्यात जातीवाचक शिवीगाळ, मारहाण व लैंगिक छळ करण्यात आल्याचा आरोप आहे. वंचित बहुजन आघाडीने या प्रकरणी रविवारी रात्री मध्यरात्री उशिरापर्यंत आंदोलन केले.
हे ही वाचा…
पुण्यात दलित तरुणींच्या छळाचा मुद्दा तापला:पोलिस नसलेल्या व्यक्तींकडून बेकायदा चौकशी; रोहित पवार, वडेट्टीवार यांचा घणाघात
पुणे – पुण्यातील कोथरूड पोलिसांनी 3 दलित तरुणींचा केलेल्या छळाचा मुद्दा आता चांगलाच तापला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार व काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणी पोलिसांवर विविध प्रश्नांची सरबत्ती करत त्यांच्या कर्तव्य परायणतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. विशेषतः माजी पोलिस अधिकारी तथा पोलिस नसलेल्या व्यक्ती या तरुणींच्या घरी चौकशीसाठी का गेल्या? असा संतप्त सवाल यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे. वाचा सविस्तर