आरे – जेव्हीएलआर मेट्रो स्टेशनवर प्रवाशांची संख्या वाढवण्यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (mmrc) फिल्म सिटी मार्गे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानापर्यंत रोपवे (ropeway) बांधण्याची योजना आखत आहे.
एमएमआरसीकडे मुंबई (mumbai) मेट्रो 3 किंवा अॅक्वा लाईन बांधण्याचे, चालवण्याचे आणि देखभाल करण्याचे काम आहे. ॲक्वा लाईन आरे-जेव्हीएलआर आणि वरळी येथील आचार्य अत्रे चौक दरम्यान अंशतः कार्यरत आहे.
ऑक्टोबर 2024 मध्ये सुरू झाल्यापासून कमी प्रवासी संख्या ही या मेट्रो मार्गिकेबाबत चिंतेची बाब आहे. प्रस्तावित रोपवे प्रणाली केवळ पर्यटकांनाच नव्हे तर गोरेगाव-मुलुंड लिंक रोड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जनरल अरुण कुमार वैद्य रोडच्या दिंडोशी आणि यशोधाम जंक्शनवरच्या दैनंदिन प्रवाशांनाही सेवा देईल.
“मुंबई मेट्रो 3 च्या आरे मेट्रो स्टेशनला गोरेगाव येथील फिल्म सिटीशी जोडण्यासाठी रोपवे सिस्टीम विकसित करण्याचा आमचा प्रस्ताव आहे, ज्याचा विस्तार संजय गांधी राष्ट्रीय उद्यानापर्यंत शक्य आहे.” असे एमएमआरसीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने हिंदुस्तान टाईम्सला सांगितले.
तसेच ते पुढे म्हणाले की, “या प्रकल्पाचे उद्दिष्ट फिल्म सिटी, एक प्रमुख रोजगार आणि पर्यटन स्थळ आणि सध्या मर्यादित सार्वजनिक वाहतूक सुविधा आणि रस्त्यांच्या कोंडीने ग्रस्त असलेल्या आजूबाजूच्या भागांशी शेवटच्या मैलापर्यंतची कनेक्टिव्हिटी सुधारणे आहे.”
आरे-जेव्हीएलआर मेट्रो स्टेशनच्या पलीकडे, आरेच्या टेकड्या ओलांडून, 3 किमी लांबीच्या रोपवेमुळे प्रवासाचा विस्तार होईल अशी अधिकाऱ्यांची अपेक्षा आहे. सध्या संरेखनाचे अंतिम काम सुरू आहे.
“हे दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना, पर्यटकांना आणि उद्योग व्यावसायिकांना सेवा देईल आणि भूसंपादन आणि पर्यावरणीय अडथळा कमी करेल,” असे अधिकाऱ्याने पुढे सांगितले.
हेही वाचा