भाजप आमदार परिणय फुकेंचे वादग्रस्त विधान: म्हणाले- शिवसेनेचा बाप मीच, माफी मागावी अन्यथा शिवसेना शैलीत उत्तर देऊ- शिंदे गट – Nagpur News



भाजप पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात भाजप आमदार परिणय फुके यांनी शिवसेना पक्षाबाबत वादग्रस्त विधान केले आहे. शिवसेनेचा बाप मी असल्याचे विधान फुके यांनी केले होते. यावरून शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी नाराज झाल्याचे पाहायला मिळाले आहे. हे शिवसेना कार्य

.

यावेळी शिवसेना लोकसभा प्रमुख संजय कुंभलकर म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे हेच शिवसेनेचे बाप आहेत. अशा परिस्थितीत कोणीही जबरदस्तीने शिवसेनेचे अवैध बाप बनण्याचा प्रयत्न करू नये. नुकत्याच झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत फुके यांनी शिवसेनेचे उमेदवार डॉ. प्रकाश मालगावे यांना पराभूत करण्यासाठी काँग्रेस उमेदवाराला सहा मते देण्याचे षड्यंत्र रचले. त्यामुळे मालगावे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. फुके यांनी शिवसेनेबद्दल अपमानास्पद भाषा वापरून कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा नेत्याला आवरावे, अन्यथा शिवसेनेचा बाप कोण आहे हे आम्ही सांगू, असा इशारा त्यांनी दिला.

शिवसेना शिंदे गटाच्या पत्रकारपरिषदेला शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल गायधने, उपप्रमुख सुरेश धुर्वे, जिल्हा उपप्रमुख विजय काटेखाये, दीपक गजभिये, प्रकाश मालगावे, मनोज साकुरे, देवराज बावनकर, बंडू हटवार उपस्थित होते.

आमदार भोंडेकर यांच्या कामात फुकेंचा हस्तक्षेप

संजय कुंभलकर म्हणाले की, 1 ऑगस्ट रोजी जिल्हा नियोजन भवनात महसूल विभागाच्या बैठकीत आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना घरकुल धारकांना वाळू कधी दिली जाईल, अशी विचारणा केली. त्याचवेळी, फुके हे भोंडेकर यांना जबरदस्तीने अडवत होते आणि त्यांचा मुद्दा टाळण्याचा प्रयत्न करत होते. आमदार भोंडेकर यांच्या मुद्द्यात फुके जबरदस्तीने हस्तक्षेप करत असल्याने त्यांनी बैठकीतून निघून जाणे पसंत केल्याचे त्यांनी सांगितले.

परिणय फुके नेमके काय म्हणाले?

परिणय फुके म्हणाले, माझ्यावर अनेकांनी खापर फोडले. मी काही कोणाच्या आरोपाला उत्तर देत नाहीत. पण, त्या दिवशी मला हे माहीत झाले की, कसे असते तुमच्या घरी जर पोराला चांगले मार्क मिळाले, तर कोणाचे कौतुक होते पोरगा किंवा आई. काही चांगले झाले तर कोणी केले आईने केले आणि जर काही खराब झाले तर कोणी केले, बापाने केले. त्या दिवशी मला हे पक्क माहीत झाले की शिवसेनेचाही बाप मीच आहे, असे वादग्रस्त विधान परिणय फुके यांनी केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24