राज्याचे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज (3 ऑगस्ट) त्यांच्या कुटुंबासह ‘मेघदूत’ या बंगल्यात गृहप्रवेश केला. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर त्यांना हा बंगला शासकीय निवासस्थान म्हणून देण्यात आला. मात्र, ‘मेघदूत’ बंगला केवळ निवासस्थान
.
देसाई कुटुंबाची मेघदूत बंगल्याशी भावनिक नाळ जोडलेली आहे. मंत्री शंभूराज देसाई यांचे आजोबा स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांना मंत्रीपद मिळाल्यानंतर ‘मेघदूत’ बंगला निवासासाठी मिळाला होता. त्या काळातच शंभूराज देसाई यांचा याच बंगल्यात जन्म झाला आणि त्यांनी आपल्या आयुष्यातील बालपणाची पाच वर्षं या घरातच घालवली. त्यामुळे जवळपास 55 वर्षांनंतर पुन्हा या वास्तूत पाऊल ठेवताना भावना अनावर झाल्या.
गृहप्रवेशाच्या क्षणी शंभूराज देसाई आणि त्यांच्या मातोश्रींच्या त्या वास्तूप्रती असलेल्या भावना अनावर झाल्या. घरात पाऊल टाकताच शंभूराज देसाई आणि त्यांच्या मातोश्रींच्या डोळ्यांत पाणी आले. यावेळी संपूर्ण देसाई कुटुंब देखील भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. एकेकाळी बालपणाच्या आठवणी जपणाऱ्या घरात परत आल्याचा अनुभव शंभूराज देसाई यांच्यासाठी अनमोल ठरला. पारंपरिक पद्धतीने गृहप्रवेशाचा विधी पार पडला. गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात देसाई कुटुंबातील सदस्य, नातेवाईक आणि काही निकटवर्तीय उपस्थित होते.
काय म्हणाले शंभूराज देसाई?
यावेळी शंभूराज देसाई माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, आज नवीन शासकिय निवासस्थान मेघदूत हा बंगला मुख्यमंत्र्यांनी दिला त्यांचे आभार मानतो. आज माझ्या आईचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने गृहप्रवेश केला. लहानपणापासून या बंगल्याशी अनेक आठवणी आहेत. मी मुख्यमंत्र्यांकडे विनंती केली होती की, मेघदूत बंगला मिळावा. मी एकदाच सांगितले, दुसऱ्यांदा सांगावे लागले नाही. गृहप्रवेशावेळी आईला भरून आले, लग्नानंतर याच घरात त्यांनी प्रवेश केला. आम्ही सर्वच भावूक झालो. लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी महाराष्ट्रात मोठे काम केले. तसेच कार्य माझा हातून घडावे, या माझ्या भावना आहेत.
आई-वडील दोघांची इच्छा होती की, मी स्पर्धा परीक्षा द्यावी. आई म्हणायची तू कलेक्टर होवो. पुण्यात शिकायला असताना मला सांगितले जायचे की देशपांडे सरांकडे जा. माझ्या वडिलांचे निधन झाले, त्यानंतर सर्व जबाबदारी माझ्यावर होती. मतदार संघातील दिग्गज नेत्यांनी आईंना विनंती करून मला राजकारणात पाठवण्यास सांगितले, असा अनुभवही शंभूराज देसाई यांनी सांगितला.
हे ही वाचा…
नितीन गडकरींच्या निवासस्थानाला बॉम्बने उडविण्याची धमकी:सुरक्षा यंत्रणा सतर्क, नागपूरमधील दोन्ही घरांची सुरक्षा वाढवली; एकाला अटक
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूरमधील घराला थेट बॉम्बने उडविण्याची धमकी रविवारी सकाळी मिळाली. एका अज्ञात व्यक्तीने फोन करून ही धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली असून, पोलिस आणि गुप्तचर यंत्रणांनी तत्काळ पावले उचलत, नितीन गडकरींच्या दोन्ही निवासस्थानी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. दरम्यान, धमकीचा कॉल फेक कॉल असल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली असून, या प्रकरणती एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. सविस्तर वाचा…