‘मुलांसोबत झोपते, तुम्ही रांXX आहात’; पुणे पोलिसांवर महिलेचा गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?


Pune News: पुण्यातील तीन महिला सामाजिक कार्यकर्त्यांना कोथरूड पोलिसांनी एका पीडित महिलेला मदत केल्याबद्दल ताब्यात घेत मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे. तसंच, पोलिसांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याचाही आरोप केला आहे. पीडित महिलांनी तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी ती नोंदवून घेण्यास नकार दिला, असा दावा करण्यात येत आहे. तर दुसरीकडे पोलिसांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (SP) खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील यासंदर्भात ट्विट केलं आहे. 

सामाजिक कार्यकर्ता महिलेने फेसबुकवर एक व्हिडिओदेखील पोस्ट केला आहे. महिलांना अर्वाच्य व जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली, असा आरोप करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रेमा पाटील आणि संभाजीनगर येथील कॉन्स्टेबल संजीवनी शिंदे यांनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली आहे, असा आरोप महिलांनी केला आहे. तसंच, ‘तुम्ही रांXX आहात, मुलांसोबत झोपतेस का? तु्म्ही सगळे LGBT आहात का? अशी भाषा वापरण्यात आली. पाच तास रिमांड रूममध्ये ठेवण्यात आले. या काळात त्यांचे मोबाइलदेखील जप्त करण्यात आले,’ असा दावा या महिलांनी केला आहे. 

नेमकं प्रकरण काय?

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 23 वर्षीय विवाहित महिला पतीच्या त्रासाला कंटाळून पुण्यात आली होती. तिला पुण्यातील तीन महिला सामाजिक कार्यकर्त्यांनी मदत केली होती. त्या महिलेच्या नातेवाईकांपैकी एक व्यक्ती संभाजीनगरमध्ये निवृत्त पोलिस अधिकारी असल्याचं सांगितलं जातं. त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून पुणे पोलिसांची मदत घेतली. कोणत्याही वॉरंटशिवाय किंवा कायदेशीर प्रक्रियेशिवाय, कोथरूड पोलिसांनी आम्हा तीन महिलांच्या घरी छापा टाकला. यानंतर आम्हाला जबरदस्तीने ताब्यात घेऊन पोलिस स्टेशनमध्ये नेलं, असा आरोप करण्यात आला आहे.

सुप्रिया सुळेंचे ट्विट काय? 

पुण्यातील कोथरुड येथे पोलीसांनी तीन मुलींना नेऊन त्यांना जातीवाचक आणि इतर आक्षेपार्ह शब्द वापरुन त्यांचा छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबतची माहिती देणारा एक व्हिडिओ मला ‘व्हॉट्सॲप’वर प्राप्त झाला आहे. जर हे खरे असेल तर ही अतिशय गंभीर स्वरुपाची घटना आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांनी या घटनेची गांभीर्याने नोंद घ्यावी.  या एकंदर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, असं ट्विट सुप्रिया सुळेंनी केलं आहे.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24