राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यावर शिवसेना (उबाठा) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी जोरदार टीका केली आहे. त्यांनी शिरसाट यांच्या वादग्रस्त विधानाचा संदर्भ देत “धृतराष्ट्र, फडणवीसजी, वाह्यात शिरस
.
शिरसाट यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या उद्घाटनावेळी वादग्रस्त विधान करत म्हटले होते, “वसतिगृह पाच-दहा कितीही कोटींचं राहू द्या, मी मंजूर करेल. आपल्या बापाचं काय चाललंय? पैसा सरकारचा आहे. या वक्तव्यामुळे आधीच टीकेचा धनी ठरलेले शिरसाट पुन्हा वादात सापडले आहेत. अंधारे यांनी याच विधानाचा आधार घेत भाजप सरकारच्या नैतिक अधःपतनावर सवाल उपस्थित केला आहे.
सुषमा अंधारेंचे ट्विट काय?
सुषमा अंधारे यांची X वरील पोस्टमध्ये म्हटलंय की, निव्वळ ५वर्षात २५पट संपत्ती, वादग्रस्त ठरल्यानंतर विट्स हॉटेलच्या लिलावातून माघार,भल्या मोठ्या रोकड रकमेसह स्वतःच्याच बेडरूममधले व्हिडिओ व्हायरल,..आपल्या बापाचा माल थोडीच आहे सरकारचा पैसा आहे लुटा.. हा बेतालपणा,फडणवीसजी, वाह्यात शिरसाट चा राजीनामा कधी होणार? #धृतराष्ट्र असे म्हणत उबाठाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस सरकारवर टीका केली आहे.
शिरसाट यांचे वक्तव्य काय?
‘वसतिगृह पाच-दहा कितीही काेटीचं राहू द्या, मी ते मंजूर करेल. आपल्या बापाचं काय चाललंय? पैसा सरकारचा आहे,’ असे वादग्रस्त वक्तव्य राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केले. निमवाडीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या नूतन वास्तूच्या लोकार्पण सोहळ्यात ते बाेलत हाेते.