सोलापूर मागील शैक्षणिक वर्षात शालेय क्रीडा स्पर्धेच्या वेळी तांत्रिक कमिटी नियुक्ती न केल्यामुळे अनेक खेळांच्या स्पर्धेच्या वेळी भांडण झाले पुन्हा भांडण होऊ नये यासाठी मुख्य तांत्रिक कमिटी स्थापन करावे असे क्रीडा शिक्षकांनी मागणी केली आहे . सोलापूर जिल्हा क्रीडा कार्यालय व सोलापूर, महापालिकेच्या वतीने शालेय क्रीडा स्पर्धेच्या नियोजनासाठी क्रीडा शिक्षकांची बैठक आयोजित केले होते. अध्यक्षस्थानी जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार होते . यावेळी महापालिकेचे माजी क्रीडा अधिकारी मच्छिंद्र घोलप, क्रीडा अधिकारी नदीम शेख, क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष दशरथ गुरव, अध्यक्ष संतोष खेंडे उपस्थित होते. ८० शाळेच्या क्रीडा शिक्षक उपस्थित होते. नरेंद्र पवार म्हणाले, सोलापूर जिल्हा क्रीडा कार्यालयात व महापालिका क्रीडा कार्यालयात कर्मचाऱ्यांची संख्या बोटावर मोजणे इतकेच आहे. स्पर्धा घेण्यास अनेक अडचणी येत आहेत . जोपर्यंत शासन कर्मचारी देत नाहीत तो पर्यंत क्रीडा शिक्षक व क्रीडा संघटना यांच्या मदतीने क्रीडा स्पर्धा घेण्यात येतील विनाअनुदानित शाळेतील क्रीडा शिक्षक व बीपीएड झालेल्या शिक्षकांची मदत घेऊन क्रीडा स्पर्धा पार पाडाव्या लागतील. संगमेश्वर कॉलेजचे प्रा. संतोष खेंडे म्हणाले, अनेक वर्षापासून शालेय क्रीडा स्पर्धेच्या वेळी खूप अडचणी येतात त्या अडचणी दूर न झाल्यास शालेय क्रीडा स्पर्धेला सहकार न करण्याचा निर्णय घ्यावा. श्राविकाचे सुहास छंचुरे यांनी क्रीडा स्पर्धा सुरू असताना वाद होता. भांडण मिटवण्यासाठी मुख्य तांत्रिक कमिटी नियुक्ती करण्याची मागणी केली. ऑलिम्पिक खेळांना महत्त्व देऊन खेळाडू घडवले पाहिजेत असे वालचंद कॉलेजचे प्रा. राहुल हजारे म्हणाले. सोलापूर शहराच्या क्रीडा स्पर्धा लवकर सुरू कराव्यात असे गांधीनाथा विद्यालयाचे शिवानंद सुतार यांनी सांगितले. शासनाच्या योजना सर्व शाळांसाठी राबवा स्पर्धेच्या वेळी काम करण्यासाठी 10 कर्मचारी द्या, शौचालय असलेल्या ठिकाणी स्पर्धा घ्या, मुलींना चेंजिंग रूम ठेवा, सकाळी वेळेवर स्पर्धा सुरू करा, शासनाच्या योजना सर्व शाळांसाठी राबवा, स्पर्धेच्या तारखा लवकर जाहीर करा.
Source link