प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २० व्या हप्त्याचे वितरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसी येथून ऑनलाइन पद्धतीने झाले. पुणे जिल्ह्यातील ४ लाख ५१ हजार ८५० शेतकऱ्यांच्या खात्यात ९० कोटी ३७ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. या कार्यक
.
कृषी विभागाच्या आढावा बैठकीत बोलताना कृषीमंत्री भरणे यांनी सांगितले की भविष्यात शेतीला निश्चितच चांगले दिवस येणार आहेत. त्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून लोकाभिमुख पद्धतीने कार्यरत राहावे असे निर्देश त्यांनी दिले.
बैठकीला कृषी आयुक्त सूरज मांढरे, विभागीय कृषी सहसंचालक दत्तात्रय गवसाने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, आत्माचे प्रकल्प संचालक सूरज मडके आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.
कृषीमंत्री भरणे यांनी कृषी विभागाची रचना, कृषी विद्यापीठे, संशोधन केंद्रे, महाबीज आणि इतर महामंडळांची संक्षिप्त माहिती घेतली. त्यांनी पीक विमा योजना, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना आणि नमो किसान योजनेबाबत माहिती घेतली.
कृषी आयुक्त मांढरे यांनी सांगितले की ‘पीएम किसान सन्मान निधी’ योजनेचे राज्यात नोंदणीकृत १ कोटी २३ लाख ९२ हजार लाभार्थी आहेत. २० व्या हप्त्यासाठी ९६ लाख ५१ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात प्रत्येकी २ हजार रुपयांप्रमाणे एकूण १ हजार ९३० कोटी २३ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. दरवर्षी तीन हप्त्यात एकूण ६ हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जातात.