Rohini Khadse meets Sharad Pawar : काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांच्या जावयाला रेव्ह पार्टी करताना रंगेहात पकडल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली. पुण्यातील खराडी भागात झालेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापेमारी केल्यानंतर तिथे प्रांजल खेवलकरला अटक करण्यात आली. या पार्टीत कोकेन, गांजा आणि मोठ्या प्रमाणात दारूचा वापर करताना पोलिसांनी दिसून आला. पोलिसांनी हा सर्व माल जप्त केला. प्रांजल खेवलकर न्यायालयीन कोठडीत असून लवकरच जामिनीसाठी अर्ज करण्यात येईल अशी दाट शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यातच आज रोहिणी खडसे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर राजकीय वर्तुळात कुचबुच सुरु झाली आहे. (Rohini Khadse meets Sharad Pawar pranjal khewalkar arrest pune)
प्रांजल खेवलकरसाठी जामिनीसाठी अर्ज करणार का?
प्रांजल खेवलकरसाठी जामिनीसाठी अर्जसंदर्भात रोहिणी खडसे म्हणाल्यात, ‘आम्ही सगळे कुटुंबीय एकत्र मिळून याबाबत चर्चा करुन निर्णय घेऊ. त्यानंतर जामिनासाठी अर्ज करु. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने याबद्दल न्यायालयाबाहेर बोलणं चुकीचे आहे. आम्हाला जी काही बाजू मांडायची आहे, ती आम्ही वकिलांमार्फत कोर्टात मांडणार आहोत. मलाही जी काही बाजू मांडायची असेल ती योग्य ठिकाणी आणि योग्यवेळी मी मांडणार आहे. या प्रकरणाची चौकशी एनडीपीएस कलमांच्या माध्यमातून होणे अपेक्षित आहे’, असं ते यावेळी म्हणाल्यात.
त्या पुढे म्हणाल्यात ‘मी माझ्या पतीला भेटण्यासाठी सीपी कार्यालयात गेले होते आणि एक वकील म्हणून भेटायला गेले होते. मला कोर्टात दुसऱ्या दिवशी हजर व्हायचे होते आणि मला त्यांच्याकडून काही माहिती हवी असल्याने मी गेले होते. त्यावेळीच कार्यालयात सीपी साहेब असल्याने मी त्यांची देखील भेट घेतली.’
शरद पवारांना भेटल्यानंतर रोहिणी खडसे काय म्हणाल्यात?
रोहिणी खडसे म्हणाल्यात की, ही भेट पक्षसंघटनेतील महत्त्वाच्या मुद्दावर आणि नियुक्तासंदर्भात चर्चा करण्यासाठी भेट घेतली. अधिवेशन चालू असल्याने शरद पवार यांच्याशी चर्चा राहिली होती, असं त्या शरद पवार भेटीवर म्हणाल्यात.
रूपाली चाकणकरांच्या टीकेवर रोहिणी खडसे काय बोलल्यात?
रूपाली चाकणकरांच्या टीकेवर रोहिणी खडसे थेट म्हणाल्यात की, करू द्या मग काय झालं, मी योग्य वेळी प्रत्येकाला उत्तर देणार आहे. पोलिसांनी सांगितले की, पाळत ठेवणे हा आमचा हेतू नव्हता. त्यांनी त्यांच्या वतीने आम्हाला भेट घेऊन हे सांगितलं. तुम्ही मला त्या केस संदर्भात न्यायालयात जी चर्चा झाली ते मला विचारू नका. विरोधी पक्षातील नेत्यांना टार्गेट केले जातं, असं म्हणायला जागा असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.