कमी पैसे आहेत? काळजी नसावी; ₹ 50,000 हून कमी किमतीत मिळतेय ही स्कूटर…


Auto News : इलेक्ट्रीक वाहनांना ग्राहकांकडून मिळणारी पसंती पाहता सातत्यानं वाहन निर्मात्या कंपन्यांनकडून कमी किमतीतसुद्धा ग्राहकांच्या गरजा केंद्रस्थानी ठेवत वाहनांची निर्मिती केली जात आहे. यामध्ये फक्त कारच नव्हे, तर स्कूटर आणि बाईकचासुद्धा समावेश आहे. 

विविध मॉडेलमध्ये बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असणाऱ्या स्कूटर अनेकांसाठी किफातशीर ठरत असून, बऱ्याचदा वाहतूक कोंडीच्या रस्त्यांसाठी एक उत्तम पर्याय ठरतात. पुरेशी जागा आणि सहजता असणाऱ्या याच स्कूरच्या यादीत हिरो मोटोकॉर्पच्या एका मॉडेलला कमाल ग्राहकपसंती मिळताना दिसत आहे. एकट्या जुलै महिन्यात हिरो कंपनीच्या 4 लाख 49 हजार 755 युनिट मोटरसायकल आणि स्कूटरची विक्री झाली आहे. कंपनीकडून जारी करण्यात आलेल्या या आकडेवारीनुसार वाहनांचा खप 21 टक्क्यांनी वाढली आहे. 

हिरोच्या वाट्याला कमाल यश, कारण काय? 

हिरो मोटोकॉर्पनं स्कूटर विभागात डेस्टिनी 125 आणि Xoom 125 च्या दमदार विक्रीच्या बळावर या क्षेत्रावर चांगली पकड मिळवली आहे. 2025 च्या जुलै महिन्या कंपनीची VIDA ही इलेक्ट्रीक स्कूटर सर्वाधिक पसंती मिळवून गेली. ई-स्कूटर Vida VX2 ग्राहकांमध्ये विशेष पसंतीची असून, बॅटरी रेंटल स्कीमसह ही स्कूटर 44990 इतक्या एक्स शोरुम किमतीत विक्रीस उपलबह्झ आहे. 

काय आहेत Hero Vida VX2 चे फिचर? 

Hero Vida VX2 चं संपूर्ण डिझाईन आणि त्याचे सर्व फिचर Vida Z संकल्पनेवर आधारित असून, ही स्कूटर पहिल्यांदा EICMA मध्ये सादर करण्यात आली होती. Vida V2 च्या तुलनेत कंपनीची VX2 कमी दरात उपलब्ध आहे. किमान खर्चात एखादी चांगली स्कूटर घेण्याचा बेत आखणाऱ्यांसाठी हा एक उत्तम पर्याय ठरत आहे.  मिनी TFT डिस्प्लेमुळं या स्कूटरला एक स्मार्ट टच मिळत आहे. 

राहिला मुद्दा या स्कूटरच्या मायलेजचा तर, Vida VX2 चं टॉप व्हेरिएंट ताशी 70 किमी आणि VX2 Plus व्हेरिएंट 80 किमी प्रतितास इतकं मायलेज/ रेंज देते. Hero Vida VX2 चं Go व्हेरिएंट 2.2 kWh रिमुवेबल बॅटरीसह 92 किमी इतकी रेंज देतं. तर, VX2 Plus 3.4 kWh सह 142 किमी  (IDC सर्टिफाइड)ची रेंज देतं. 





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24