पुण्याच्या विकासात दादागिरी, माइंडसेट बदलावा लागेल; देवेंद्र फडणवीसांचा रोख नेमका कोणाकडे?


Devendra Fadanvis: ‘पुण्यातील उद्योगात, व्यापारात मोठ्या प्रमाणात दबाव पाहायला मिळत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. ‘आम्हालाच कंत्राट द्या, आम्ही म्हणतो त्याच रेटने व्यवहार करा ही मानसिकता संपवल्याशिवाय पुण्याचा विकास होणार नाही,’ असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय.

 पुण्याच्या विकासात दादागिरी घुसल्याचं वक्तव्य फडणवीसांनी केलंय आणि त्यासाठी आपल्याला माइंडसेट बदलावा लागेल असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी दिलाय. पुण्यात पुण्यात काल पुणे मेट्रो पॉलिटन रिजन ग्रोथ हबचा शुभारंभ झाला त्यावेळी ते बोलत होते.

‘मो्ठ्या प्रमाणात उद्योग क्षेत्रात, व्यापारांमध्ये एक दबाव पाहायला मिळतो. आमच्याचकडून खरेदी करा, आमचीच माणसं घ्या, आम्हालाच कंत्राट द्या, आम्ही म्हणतो त्याच रेटने खरेदी करा, ही मानसिकता आपण बदलली नाही तर पुण्याचा विकास पुढे होऊच शकणार नाही,’ असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

‘आज पुण्याच्या विकासामधला सगळ्यात मोठा बॉटलनेक कोणता असेल तर तो म्हणजे दुर्देवाने या ठिकाणी जी दादागिरी घुसली आहे जी गुंतवणुकदारांना हा निर्णय घेऊ देत नाही की त्याला काय परवडणार आहे आणि म्हणून या सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत त्या सगळ्या प्रक्रिया एक प्रकारे आपले माइंटसेटदेखील बदलावे लागेल,’ असं फडणवीसांनी म्हटलं आहे.

दरम्यान, काल पुण्यात केंद्रीय रस्ते वाहतूक मंञी नितीन गडकरी यांना यंदाचा टिळक पुरस्कार दिला गेला. त्यावेळी मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा पार पडला. तेव्हा, मंचावर अनेक राजकीय किश्शांची रंगत पाहायला मिळाली. 

अजित पवारांनी पुणेकर अजूनही तुम्हाला पुण्याचे समजत नाहीत. ते तुम्हाला कोल्हापूरचेच समजतात. अशा प्रकारे चिमटा काढला होता. त्यानंतर आता फडणवीस यांनी चंद्रकांत पाटील यांची पाठराखण केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना फडणवीस यांनी पुरस्कार प्रदान केल्यानंतर आपल्या भाषणात चंद्रकांत पाटील यांचे नाव घेत मिश्किल विनोद केला आहे. भाषण सुरू झाल्यावर त्यांनी नितीन गडकरी यांच्या पुरस्काराचे कौतुक केले. ते म्हणाले, ज्यांनी महाराष्ट्र देशाला नवीन स्वरूप दिलं. असे लाडके नेते नितीनजी गडकरी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पुण्याचे दुसरे दादा जे कधीही दादागिरी करत नाहीत असे चंद्रकांत दादा असं म्हणताच सभागृहात हास्यकल्लोळ झाला. काही लोक दादागिरी करत नाहीत. पण त्यांचं व्यक्तिमत्वचं तस असतं असं म्हणत दादांचे कौतुक केले. त्यानिमित्ताने या पुरस्कार सोहळ्यात राजकीय विनोदही ऐकायला मिळाल्याची चर्चा होती.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24