माझ्यावर हल्ला झाला तेव्हा अनेकांनी मला फोन करत काळजी घ्या,असे सांगितले होते. त्यावेळी शरद पवार यांनी देखील मला काळजी घ्यायला हवी असे सांगितले होते. परिस्थिती पाहता मी संरक्षण घ्यावे अशी शरद पवारांची भावना होती त्यांनी तसे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फ
.
प्रवीण गायकवाड म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये सध्या जी परिस्थिती आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे. प्रतिगामी-पुरोगामी यांच्यात जो संघर्ष उभा राहिला आहे त्यांची तीव्रता लक्षात आणून देण्यासाठी मी आज पवारांची भेट घेतली.
प्रत्येकाने जबाबदारीने सोशल मीडियावर व्यक्त व्हावे
प्रवीण गायकवाड म्हणाले की, महाराष्ट्रात आणि देशात वेगवेगळ्या जाती, धर्म आणि लोकांमध्ये एक संघर्ष निर्माण झाला आहे. लोकशाहीमध्ये हा संघर्ष अपेक्षित नाही. निश्चितच लोकशाहीमध्ये वेगवेगळे धर्म आणि समुदाय आहेत, यांच्यामध्ये संवाद असायला हवा. पण 2014 नंतर महाराष्ट्रात जात, वर्ग,धर्म यांच्यात संवाद राहिलेला नाही. यासाठी अनेक कारणं आहेत ज्यातील काही म्हणजे एखाद्या विशिष्ट समुदायाबद्दल द्वेष पसरवला जातो. समाज माध्यम, सोशल मीडियावरही पोस्ट असतील यातून पसरणारा द्वेष असेल. मला असे वाटते की प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने सोशल मीडियावर व्यक्त व्हायला हवे. आपण जे लिहितो त्यातून कुणाच्या भावना दुखावल्या जाऊ नये, शांतता प्रस्थापित व्हावी ही आमची भावना आहे.
संभाजी ब्रिगेड एकत्र येणार
प्रवीण गायकवाड म्हणाले की, 2014 मध्ये संभाजी ब्रिगेड या सामाजिक संघटनेचा अध्यक्ष म्हणून काम करत होतो. मी त्या पदाचा राजीनामा दिला तेव्हा मनोज आखळे हे संघटनेचे अध्यक्ष झाले. त्यांनी 2016 मध्ये संभाजी ब्रिगेड हा राजकीय पक्ष स्थापन केला. संभाजी ब्रिगेड ही संघटना राजकारण विरहित फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारसरणीवर काम काम करणारी संघटना आहे. परंतू 2016 मध्ये राजकारणात आल्यावर राजकीय पक्षाने काही निवडणुका लढवल्या. पण गेल्या 6 महिन्यांपासून दोन्ही संघटना एकत्र होण्याची प्रकिया सुरू झाली. आम्ही एका विचाराने काम करत असल्याने एकत्रित काम करत आहोत. ही मराठा सेवा संघाची एक विंग आहे. खेडेकर यांनी जो निर्णय घेतला आहे त्या नुसार आता हे सर्व एकत्र येणार आहे.