एसटी बसमध्येच प्रवाशावर कोयत्याने वार: हल्लेखोराने स्वतःच्याही गळ्याला लावला कोयता, बारामती परिसरातील घटनेने खळबळ – Pune News



पुण्यात कोयता गॅंगने चांगलीच दहशत माजवली आहे. गेल्या काही महिन्यात कोयता गॅंगचे अनेक प्रकरण समोर आली आहेत. त्यात आता बारामती परिसरात देखील एक धक्कादायक घटना घडली आहे. बारामतीवरून इंदापूरला जात असलेल्या एसटी बसमध्ये एका प्रवाशावर कोयत्याने जीवघेणा हल्

.

बारामती येथून इंदापूरला जाणाऱ्या एका एसटी बसमध्ये प्रवाशावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. तसेच आरोपीने स्वतःवर देखील कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, इतर काही प्रवाशांनी प्रसंगावधान दाखवत हल्लेखोराला अडवले. या घटनेमुळे बसमध्ये एकच गोंधळ उडाला.

नेमके काय घडले?

या प्रकरणाची अधिकची माहिती अशी की, इंदापूर आगाराची एसटी बर बारामतीहून इंदापूरच्या दिशेने निघाली होती. बस जेव्हा काटेवाडी परिसरात पोहोचली, त्यावेळी मागच्या सीटवर बसलेल्या तरुणाने शेजारील प्रवाशावर अचानक कोयत्याने हल्ला चढवला. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला व रक्तबंबाळ अवस्थेत बसमधून उतरून निघून गेला. हल्लेखोर आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने कोयत्याने स्वतःच्या गळ्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, बसमधील काही जागरूक प्रवाशांनी वेळीच त्याला अडवले व त्याच्या हातून कोयता काढून घेतला. पोलिसांना या घटनेची माहिती देताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले व आरोपीला ताब्यात घेतले.

हल्लेखोर आणि जखमी तरुण एकमेकांना पूर्वीपासून ओळखत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दोघांमध्ये काही कारणांवरून वाद झाले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु, हल्ला नेमका का करण्यात आला याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलिस त्यानुसार हल्लेखोराची चौकशी करत आहेत.

तसेच जखमी झालेला तरुण रक्तबंबाळ अवस्थेत काटेवाडी येथे बसमधून उतरला आणि कुठेतरी निघून गेला. तो नेमका कोण होता, याची माहिती अद्याप पोलिसांना मिळाली नाही. हा प्रकार घडला त्यावेळी इतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हा हल्ला झाल्यानंतर एकच गोंधळ उडाला होता.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24