बेस्ट डबल डेकर बसला सप्टेंबर 2023 मध्ये सेवेतून निरोप देण्यात आला आणि निवृत्त झालेली शेवटची डबल डेकर (double decker bus) आणिक आगारातील संग्रहालयात उभी करण्यात आली.
महाराष्ट्र टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, या बसच्या आठवणींना मुंबईकरांना उजळा देता यावा आणि बसचा इतिहासही पाहता यावा यासाठी ‘बेस्ट’ उपक्रमाने या बसमध्ये बदल करत ती ‘स्मारक बस’ म्हणून स्थानापन्न करण्याचा निर्णय घेतला आहे.
डबल डेकर बसचे बदलते स्वरूप, चित्रपटात असणारे स्थान, अन्य राज्यांनीही घेतलेली दखल, सामाजिक कार्यातील सहभाग या ‘स्मारक बस’ (smarak bus) मध्ये उलगडण्यात आला आहे. 7 ऑगस्टला बेस्ट दिन असतो. तेव्हापासून ही बस मुंबईकरांना (mumbai) स्मारक बस म्हणून पाहण्यास मिळणार आहे.
‘बेस्ट’चा इतिहास पाहता बेस्टची पहिली बस 15 जुलै 1926 साली सुरू झाली. त्यापूर्वी मुंबईत ट्रॅम धावत होती. कालांतराने यात बदल होत गेले आणि सिंगल डेकर बसच्या जोडीला डबल डेकर बसही सेवेत आल्या.
बेस्टची (best) पहिली डबल डेकर बस 8 डिसेंबर 1937 साली सुरू झाली. सिंगल डेकर बसची प्रवासी क्षमता कमी असल्याने डबल डेकर बसगाड्या वाढवण्यावर ‘बेस्ट’ उपक्रमाने भर दिला होता.
अवघ्या पंधरा वर्षांचेच आयुर्मान, तांत्रिक समस्या इत्यादी कारणांमुळे याची संख्या हळूहळू कमी होऊ लागली. सप्टेंबर 2023 मध्ये अखेरची नॉन एसी डबल डेकर बस धावली.
मुंबईत स्वातंत्र्यपूर्वीकाळापासून इंग्रजांच्या काळात सुरू झालेली डबल डेकर बस नेमकी कशी होती, शेवटची बस प्रवासी आणि पर्यटकांना पाहता यावी, यासाठी आणिक आगार येथील ‘बेस्ट’ उपक्रमाच्या संग्रहालयात ती ठेवण्यात आली.
आता बेस्ट प्रशासनाने डबल डेकर बसचा इतिहास दाखवण्याचा निर्णय घेतला व त्यानुसार बदल केल्याची माहिती बेस्टचे कर्मचारीय विभागाचे सहायक कार्यदेशक यतीन पिंपळे यांनी सांगितले.
‘स्मारक बस’ हे संग्राहालय म्हणूनही ओळखले जाणार आहे. याच्या दोन्ही मजल्यावर ‘बेस्ट’च्या डबल डेकर बसच्या इतिहासाची माहिती देणारे फ्रेम लावण्यात आल्या आहेत.
बसच्या तळमजल्यावरील जागेत माहिती देणाऱ्या फ्रेम ठेवतानाच टेलिव्हिजन माध्यमातूनही मुंबईकरांना याची माहिती देण्यासाठी एलसीडी टिव्हीही ठेवण्यात आला आहे.
यामुळे कालबाह्य झालेल्या डबलडेकर बसची माहिती, इतिहास आणि अस्तित्वाची ओळख भविष्यात येणाऱ्या मुंबईच्या भावी पिढ्यांनाही समजणार आहे.
हेही वाचा