विशेष एनआयए कोर्टाने गुरूवारी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्वच आरोपींची निर्दोष सुटका केली. याविषयी संमिश्र प्रतिक्रिया येत असताना आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अनिल देसाई यांनी या प्रकरणाच्या तपासावरच शंका उपस्थित केली आहे. तपा
.
29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावच्या भिकू चौकात एका दुचाकीवर स्फोट झाला होता. त्यात 6 जण ठार, तर 90 हून अधिक जण जखमी झाले होते. विशेष एनआयए कोर्टाने या प्रकरणी गुरूवारी झालेल्या सुनावणीत आपला निकाल दिला. त्यात भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञासिंह, कर्नल प्रसाद पुरोहित, रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर चतुर्वेदी, समीर कुलकर्णी व सुधाकर धर द्विवेदी या सर्व 7 आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली. या पार्श्वभूमीवर अनिल देसाई यांनी तपास यंत्रणाच्या कर्तव्य परायणतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
आरोप सिद्ध होत नसतील तर हे मोठे दुर्दैव
अनिल देसाई म्हणाले की, हे सलग दुसरे प्रकरण आहे. मुंबई साखली बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींची ज्या पद्धतीने सुटका करण्यात आली, त्याच प्रकारे मालेगाव प्रकरणातील आरोपींचीही सुटका झाली. त्यामुळे असा प्रश्न उपस्थित होतो की, सरकारी वकिलांनी काय केले? त्यांनी कशाप्रकारे तपास केला, चौकशी केली. त्यांनी पुरावे शोधले का? सरकारी पक्षाने कशा पद्धतीने आपले म्हणणे मांडले? कोर्टाने आरोप संशयापलीकडे सिद्ध झाले नाहीत, त्यामुळे आरोपींची सुटका केल्याचे स्पष्ट केले. जर तपास यंत्रणा निःसंशयपणे शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील तर हे फार मोठे दुर्दैव आहे, असे ते म्हणाले.
ही कशा पद्धतीची कायदा सुव्यवस्था आहे?
लोकांचा सुरक्षेवर विश्वास असतो. भारताचा नागरीक म्हणून मी माझ्या परिसरात सुरक्षित आहे. इथे सुरक्षा व्यवस्था चांगली आहे. सरकार व सरकारसोबत असणाऱ्या सुरक्षा व्यवस्था चांगले काम करत आहेत. पण असे घडत असेल तर जे निष्पाप लोक मारले गेले, त्यांचे कुटुंबीय काय विचार करतील? कशा पद्धतीची कायदा सुव्यवस्था आहे? असेही अनिल देसाई या प्रकरणी बोलताना म्हणाले.
हे ही वाचा…
मालेगाव बॉम्बस्फोट खटला 23 मुद्यांत:17 वर्षांनंतर सर्व आरोपींची निर्दोष सुटका; देशाला हादरवणाऱ्या या खटल्यात केव्हा काय घडले?
मुंबई – एनआयएच्या विशेष कोर्टाने गुरूवारी मालेगाव बॉम्बस्फोटाप्रकरणातील सर्वच आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली. या निर्णयामुळे या प्रकरणाचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास यंत्रणेसह महाराष्ट्र पोलिस व दहशतवाद विरोधी पथकाला जबर झटका बसला आहे. अवघ्या 23 मुद्यांत पाहू या खटल्यात केव्हा काय घडले? याची माहिती. वाचा सविस्तर