स्कूल बस: कर सूट, पण पालकांची लूट‎: विद्यार्थी वाहतुकीसाठी करात रु 2400 सुट असतानाही महिना रु 1200 भाडे – Solapur News


शाळेच्या वेळेत लाल परीची व्यवस्था नसल्याने विद्यार्थी व विद्यार्थिनींचा सुरक्षित प्रवास म्हणून ग्रामीण भागातील पालक खासगी स्कूल बसने मुलांना शाळेत पाठवत आहेत. जिल्ह्यात ९८४ वाहनांना खासगी स्कूल बस म्हणून विद्यार्थी वाहतुकीचा परवाना दिला परंतु या खासग

.

विद्यार्थी सुरक्षा समितीच्या निकषानुसार विद्यार्थ्यांचा सुखकर प्रवास होण्यासाठी पासिंग बरोबरच इन्शुरन्स आवश्यक आहे. सर्व स्कूल बस मालक-चालक संबंधित संस्थांनी मोटर वाहन अधिनियमाप्रमाणे नियमाचे पालन जबाबदारीने करून घेणे गरजेचे आहे. मात्र असे होताना दिसत नाही.

शासनाने ५ मे २०१७ ला तक्रार पेटी ठेवणे शाळेला बंधनकारक केले आहे. विद्यार्थी सुरक्षा समितीच्या नियमित आढावा बैठक घेणे बंधनकारक केलेले आहे. {चांगला वाईट स्पर्श याविषयी जनजागृती. महिला प्रतिनिधींची नेमणूक, भिंतीवर फलक, सीसीटीव्ही अशा विविध माध्यमातून विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण रोखण्याचे उपाय.

वाहतूकदारांसोबत प्रवासी वाहतुकीचा करार करण्याची जबाबदारी संबंधित शाळा समितीची आहे.अधिकृत स्कूल बस वाहन चालकांबरोबर करार करावा. वाहन नोंदणी प्रमाणपत्रावर स्कूल बसची नोंद असल्याची खात्री करावी. स्कूल कमिटी सूचना, तक्रार प्रादेशिक परिवहन कार्यालय, सोलापूर अथवा mh13@mahatranscom.in या संकेतस्थळावर करु शकते. तत्काळ दखल घेतली जाईल. – अमर गवारे, मोटर वाहन निरीक्षक.

शाळा मालकीची अथवा भाड्याने घेतलेल्या वाहनासाठी शालेय वाहतूक समितीने प्रति किलोमीटर भाडे ठरवून देणे अपेक्षित आहे. एसटी बससाठी प्रति महिना २८५ रुपये पास आहे. एसटी बसच्या तुलनेत प्रति महिना दुप्पट प्रवास फी आकारण्यास हरकत नाही. मात्र १२०० रुपये घेतले जातात. १५ विद्यार्थी बसवण्याची क्षमता असताना स्कूल बस मध्ये ३० विद्यार्थी बसवले जातात. विद्यार्थी भरल्याने अनुचित प्रकार घडल्यास जबाबदार कोण? -कांतीलाल राऊत, सामाजिक कार्यकर्ते, मोहोळ

स्कूल बस स्टीकर, स्कूलचे नाव, रूट, दरवाजात चढण्यासाठी हँडल सोय. हायड्रोलिक पायरी, मार्ग क्रमांक-रुटचा बोर्ड, दोन अग्निशामक यंत्र,प्रथम उपचार पेटी, स्वतंत्र ड्रायव्हर केबिन {

१५ वर्षापेक्षा जुनीगाडी नको. स्पीड लिमिट ५० किलोमीटर, ड्रायव्हर युनिफॉर्म, संकटकालीन मार्गाची सोय. अग्निशामक यंत्र, विद्यार्थिनी असल्यास लेडीज अटेंडंट आवश्यक आहे.

^ग्रामीण भागात स्कूल बस नियमात चालवल्या जात नाहीत. काही बस चालक तोंडामध्ये मावा, गुटखा खाऊन वाहने चालवतात. क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी बसवतात. – संजय क्षीरसागर, मोहोळ.

विद्यार्थी स्कूल बस मध्ये क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी वाहतूक केली जाते. १५ सीट क्षमता असलेल्या स्कूल बसमध्ये ३० विद्यार्थी भरले जातात. यामध्ये विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. शालेय स्कूल समिती बरोबरच पालकांची तितकीच जबाबदारी असताना देखील याकडे दुर्लक्ष केले जात आहे. बालकांच्या जीवाशी खेळणाऱ्या वाहन चालकांसह संबंधित शिक्षण संस्था समितीवर कारवाई केल्यास विद्यार्थी सुरक्षिततेचे नियम पाळले जातील. नियमाचे उल्लंघन केल्यास वाहनावर चार हजार रुपये दंड किंवा गाडी जप्त होते. शहरात स्कूलबसबाबत काही प्रमाणात नियम पाळले जातात. ग्रामीण भागात स्कूल बस वाहतूक मनमानी प्रकार पाहायला मिळतो.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24