पैठण तालुक्यातील अनेक भागांतील कपाशीच्या शेतांमध्ये आकस्मिक मर रोगाची लागण झाली आहे. तालुक्यात ५५ हजार ६०० हेक्टरवर कपाशी लागवड झाली असून आजघडीला ७ हजार हेक्टर कपाशीला या रोगाचा फटका बसण्याचा धोका आहे. मराठवाड्यात मोठ्या खंडानंतर पाऊस झाल्यानंतर ही स
.
शेतकऱ्यांनी महागडी बियाणे, खते, कीटकनाशके वापरून कपाशीचे पीक उभे केले होते. मात्र, दीर्घकाळ पाण्याचा ताण पडल्याने जमिनीचे तापमान वाढले. अशा वेळी पाऊस झाल्यास झाडांना धक्का बसतो. त्यामुळे झाडे सुकतात. पानगळ होते. नंतर झाडे मरतात. पावसानंतर ३६ ते ४८ तासांत ही लक्षणे दिसू लागली आहेत. त्यामुळे उत्पादनात मोठ्या नुकसानीची शक्यता आहे. कापसाच्या शेतातील अतिरिक्त पाणी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर काढावे. वापसा येताच कोळपणी व खुरपणी करावी. २०० ग्रॅम युरिया, १०० ग्रॅम पांढरा पोटॅश (००:००:५० खत), २५ ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराइड १० लिटर पाण्यात मिसळून तयार केलेले द्रावण प्रत्येक झाडाला १०० मिली प्रमाणात द्यावे. किंवा, एक किलो १३:००:४५ खत, २ ग्रॅम कोबाल्ट क्लोराइड, २५० ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराइड २०० लिटर पाण्यात मिसळून तयार द्रावण झाडांना १०० मिली प्रमाणात द्यावे. नंतर झाडाजवळची माती पायाने दाबावी. ही उपाययोजना झाडे सुकू लागल्याचे लक्षात येताच २४ ते ४८ तासांच्या आत करावी. यामुळे पुढील नुकसान टाळता येईल. तसेच कृषी विभागाकडून केलेल्या उपाययोजनांची करावी. पैठणसह मराठवाड्यातील दीड लाखाहून अधिक हेक्टरवरील कपाशीला मर रोगाचा फटका बसला आहे. याचा विचार करता पैठणसह मराठवाड्यात रोगाच्या प्रादुर्भावाने नुकसान झालेल्या कपाशीचे पंचनामे करावे, अशी मागणी शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी यांनी केली. मर रोगाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्यासाठी कृषी विभागाची एक टीम तयार करण्यात आली आहे. ही टीम बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत असून यामध्ये कृषी संशोधन तज्ज्ञांचा समावेश आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी विकास पाटील यांनी दिली. डॉ. जी. डी. गडदे, कृषी तज्ज्ञ, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ
नुकसानीचे तातडीने पंचनामे करावे