पुण्यातील नामवंत सीएमए नीरज जोशी यांची दी इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएमएआय) राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. ही निवड २०२५-२६ या कालावधीसाठी करण्यात आली आहे. संस्थेच्या अध्यक्षपदी सीएमए टी. सी. ए. श्रीनिवास प्रसाद यांची न
.
आयसीएमएआय ही संस्था संसदेच्या अधिनियमांतर्गत व भारत सरकारच्या कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटंट्स कायदा, १९५९ अंतर्गत स्थापन झालेली एकमेव अधिकृत संस्था आहे. ही संस्था देशातील कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग व्यवसायाचे नियमन करते.
सीएमए नीरज जोशी यांच्या निवडीबद्दल ‘आयसीएमएआय’च्या पश्चिम विभागीय समितीचे खजिनदार सीएमए चैतन्य मोहरीर यांनी आनंद व्यक्त केला आहे. पुणे चॅप्टरचे अध्यक्ष सीएमए श्रीकांत इप्पलपल्ली, उपाध्यक्ष सीएमए राहुल चिंचोळकर, सचिव सीएमए हिमांशू दवे, खजिनदार सीमए तनुजा मंत्रवादी यांनीही आनंद व्यक्त केला आहे.
सीएमए नीरज जोशी सध्या ‘आयसीएमएआय’च्या केंद्रीय कार्यकारिणी सदस्य आहेत. त्यांनी याआधी वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिल (डब्ल्यूआयआरसी) आणि कॉस्ट अकाउंटिंग स्टँडर्ड्स बोर्डच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही यशस्वीरित्या सांभाळली आहे. ते पुण्यातील नामांकित ‘धनंजय व्ही. जोशी अँड असोसिएट्स’ या फर्मचे भागीदार आहेत.
सीएमए नीरज जोशी म्हणाले, “दी इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया संस्थेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळणे ही गौरवाची बाब आहे.” संस्थेच्या सशक्त भविष्यासाठी आणि व्यवसायातील नवनवीन संधींना दिशा देण्यासाठी ते कटिबद्ध आहेत. सीएमए सदस्य आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी येणाऱ्या वर्षात विविध उपक्रमांचे, राष्ट्रीय परिषद व कार्यशाळांचे आयोजन केले जाणार आहे. राष्ट्रीय स्तरावर पुण्याचे प्रतिनिधित्व करत असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.