‘100 मधील फक्त 4 मुलीच…’ प्रेमानंद महाराजांच्या वादग्रस्त विधानामुळे गोंधळ; महिलांना संताप होतोय अनावर!

Premanand Maharaj: जगाला प्रेम, सलोख्याचा संदेश देणारे प्रेमानंद महाराज सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. तरुणींसंदर्भात त्यांनी वादग्रस्त विधान केलंय. ज्यामुळे देशभरातील महिलावर्गाकडून त्यांच्यावर संताप व्यक्त होतोय. आता प्रेमानंद महाराजांची तुलना अनिरुद्धाचार्य यांच्याशी होऊ लागली आहे. काय आहे नेमकं प्रकरण? लाखोंचा भक्तगण असलेले प्रेमानंद महाराज टिकेचे धनी का होतायत? सविस्तर जाणून घेऊया. 

काय आहे नेमकं प्रकरण?

“100 पैकी फक्त 2-4 मुलीच पवित्र असतात. आजकाल सगळे मुली-मुले गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडच्या मागे लागले आहेत.” असे वादग्रस्त वक्तव्य प्रेमानंद महाराज यांनी केला. एका एकांतिक संवादादरम्यान ते बोलत होते. प्रेमानंद महाराज यांनी आपल्या वक्तव्यात म्हटले होते की, ‘जर एखादा तरुण चार मुलींशी संबंध ठेवतो, तर तो आपल्या पत्नीवर समाधानी राहू शकत नाही, कारण त्याला व्यभिचाराची सवय लागलेली असते. त्याचप्रमाणे, ज्या मुलीने चार पुरुषांशी संबंध ठेवले, तिच्यात एका पतीला स्वीकारण्याची क्षमता राहत नाही. त्यांनी पुढे असेही म्हटले की, 100 पैकी क्वचितच 2-4 मुली अशा असतात, ज्या पवित्र जीवन जगून एकाच पुरुषाला समर्पित होतात.’ त्यांचे हे विधान सोशल मीडियावर व्हायरल झाले. या वक्तव्यावर लोकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वृंदावनातील संतांना नेमके झाले आहे तरी काय? ते मुलींविरोधात अशी वक्तव्ये का करत आहेत? त्यांना मुलींकडून नक्की काय हवे आहे? असे प्रश्न लोकं विचारतायत.

अनिरुद्धचार्यंशी का होतेय तुलना?

यानंतर प्रेमानंद महाराज यांची तुलना अनिरुद्धाचार्य यांच्याशी होतेय. अनिरुद्धाचार्य हे त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमी चर्चेत असतात. विशेषत: महिलांसोबत बोलताना त्या रुढी परंपरांच्या चष्म्यातून विधाने करतात. यामुळे त्यांच्यावर नेहमी टिका होत असते. आता प्रेमानंद महाराज यांची तुलना अनिरुद्धाचार्य यांच्याशी केली जातेय.  

काय येतायत प्रतिक्रिया? 

यासंदर्भात कथावाचक कौशल ठाकुर यांनी प्रतिक्रिया दिलीय. संतांच्या अशा बेताल वक्तव्यांमुळे सनातन धर्माला हानी पोहोचते. संतांनी अशा प्रकारची वक्तव्ये करू नयेत. तर व्यापारी रवी चौहान यांनी म्हटले की, संत वारंवार नारीशक्तीविरोधात चुकीची वक्तव्ये करत आहेत. नारीपेक्षा पवित्र कोणीच नाही. संतांनी स्वतः विचार करायला हवा की, ज्या नारीपासून त्यांचा जन्म झाला, त्या नारीशक्तीविरोधातच ते बोलत आहेत. नारीचा जेवढा आदर केला जाईल, तेवढाच त्यांचा मान वाढेल. सोशल मीडियावर व्हायरल होण्याच्या लालसेपोटी अशी वक्तव्ये केली जात असून, हे अत्यंत निंदनीय आहे.

‘प्रेमानंद महाराज मुलींची पवित्रता तपासतात का?’

या प्रकरणी उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री ओम प्रकाश राजभर यांनीही प्रतिक्रिया दिलीय. “प्रेमानंद महाराज मुलींची पवित्रता तपासतात का? त्यांच्याकडे यासाठी कोणते यंत्र आहे का? अशी बिनबुडाची वक्तव्ये थांबायला हवीत.”  काहींच्या मते, ही वक्तव्ये प्रसिद्धी मिळवण्यासाठी केली जात आहेत, तर काहींच्या मते, यामुळे सनातन धर्माच्या प्रतिमेला हानी पोहोचत आहे. या प्रकरणी कायदेशीर कारवाई आणि सामाजिक विरोध वाढत असून, यापुढेही अशा वक्तव्यांवर कठोर पावले उचलली जाण्याची शक्यता आहे.

Premanand Maharaj: जगाला प्रेम, सलोख्याचा संदेश देणारे प्रेमानंद महाराज सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. तरुणींसंदर्भात त्यांनी वादग्रस्त विधान केलंय. ज्यामुळे देशभरातील महिलावर्गाकडून त्यांच्यावर संताप व्यक्त होतोय. आता प्रेमानंद महाराजांची तुलना अनिरुद्धाचार्य यांच्याशी होऊ लागली आहे. काय आहे नेमकं प्रकरण? लाखोंचा भक्तगण असलेले प्रेमानंद महाराज टिकेचे धनी का होतायत? सविस्तर जाणून घेऊया. 

काय आहे नेमकं प्रकरण?

“100 पैकी फक्त 2-4 मुलीच पवित्र असतात. आजकाल सगळे मुली-मुले गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडच्या मागे लागले आहेत.” असे वादग्रस्त वक्तव्य प्रेमानंद महाराज यांनी केला. एका एकांतिक संवादादरम्यान ते बोलत होते. प्रेमानंद महाराज यांनी आपल्या वक्तव्यात म्हटले होते की, 'जर एखादा तरुण चार मुलींशी संबंध ठेवतो, तर तो आपल्या पत्नीवर समाधानी राहू शकत नाही, कारण त्याला व्यभिचाराची सवय लागलेली असते. त्याचप्रमाणे, ज्या मुलीने चार पुरुषांशी संबंध ठेवले, तिच्यात एका पतीला स्वीकारण्याची क्षमता राहत नाही. त्यांनी पुढे असेही म्हटले की, 100 पैकी क्वचितच 2-4 मुली अशा असतात, ज्या पवित्र जीवन जगून एकाच पुरुषाला समर्पित होतात.' त्यांचे हे विधान सोशल मीडियावर व्हायरल झाले. या वक्तव्यावर लोकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वृंदावनातील संतांना नेमके झाले आहे तरी काय? ते मुलींविरोधात अशी वक्तव्ये का करत आहेत? त्यांना मुलींकडून नक्की काय हवे आहे? असे प्रश्न लोकं विचारतायत.

अनिरुद्धचार्यंशी का होतेय तुलना?

यानंतर प्रेमानंद महाराज यांची तुलना अनिरुद्धाचार्य यांच्याशी होतेय. अनिरुद्धाचार्य हे त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमी चर्चेत असतात. विशेषत: महिलांसोबत बोलताना त्या रुढी परंपरांच्या चष्म्यातून विधाने करतात. यामुळे त्यांच्यावर नेहमी टिका होत असते. आता प्रेमानंद महाराज यांची तुलना अनिरुद्धाचार्य यांच्याशी केली जातेय.  

काय येतायत प्रतिक्रिया? 

यासंदर्भात कथावाचक कौशल ठाकुर यांनी प्रतिक्रिया दिलीय. संतांच्या अशा बेताल वक्तव्यांमुळे सनातन धर्माला हानी पोहोचते. संतांनी अशा प्रकारची वक्तव्ये करू नयेत. तर व्यापारी रवी चौहान यांनी म्हटले की, संत वारंवार नारीशक्तीविरोधात चुकीची वक्तव्ये करत आहेत. नारीपेक्षा पवित्र कोणीच नाही. संतांनी स्वतः विचार करायला हवा की, ज्या नारीपासून त्यांचा जन्म झाला, त्या नारीशक्तीविरोधातच ते बोलत आहेत. नारीचा जेवढा आदर केला जाईल, तेवढाच त्यांचा मान वाढेल. सोशल मीडियावर व्हायरल होण्याच्या लालसेपोटी अशी वक्तव्ये केली जात असून, हे अत्यंत निंदनीय आहे.

'प्रेमानंद महाराज मुलींची पवित्रता तपासतात का?'

या प्रकरणी उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री ओम प्रकाश राजभर यांनीही प्रतिक्रिया दिलीय. “प्रेमानंद महाराज मुलींची पवित्रता तपासतात का? त्यांच्याकडे यासाठी कोणते यंत्र आहे का? अशी बिनबुडाची वक्तव्ये थांबायला हवीत.”  काहींच्या मते, ही वक्तव्ये प्रसिद्धी मिळवण्यासाठी केली जात आहेत, तर काहींच्या मते, यामुळे सनातन धर्माच्या प्रतिमेला हानी पोहोचत आहे. या प्रकरणी कायदेशीर कारवाई आणि सामाजिक विरोध वाढत असून, यापुढेही अशा वक्तव्यांवर कठोर पावले उचलली जाण्याची शक्यता आहे.

[ad_3]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24