पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी कोकणात आलेल्या धुळे जिल्ह्यातील एका जोडप्याने चिपळूणमधील वाशिष्ठी नदीत उडी टाकून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चिपळूण येथील गांधेश्वर मंदिर परिसरात ही घटना घडली असून, तरुणी पाण्यात बुडतानाचा व्हिडिओ
.
सध्या कोकणात पावसाळ्यामुळे पर्यटनाला बहर आला आहे. नद्या, धबधबे आणि हिरवाईच्या सौंदर्याने नटलेला निसर्ग पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने कोकणात दाखल होत आहेत. मात्र, या आनंदाच्या पार्श्वभूमीवर ही दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट
चिपळूणमधील वाशिष्ठी नदीत उडी मारून दोघांनी जीवन संपवल्याची माहिती मिळताच पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापनाचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. सध्या एनडीआरएफचे जवान मृतदेह शोधण्याचे आणि बाहेर काढण्याचे प्रयत्न करत आहेत. दरम्यान, दोघांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. चिपळूण पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत पुढील तपास सुरू केला आहे. दोघेही धुळे जिल्ह्यातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे.
या घटनेमुळे पावसाळी पर्यटनासाठी निसर्गरम्य कोकणात आलेल्या पर्यटकांमध्ये हळहळ व्यक्त होत असून, प्रशासनाने अशा ठिकाणी सुरक्षिततेसंबंधी अधिक उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही होत आहे.
हे ही वाचा…
सरकारला चाकरमान्यांचे हाल दिसत नाहीत का?:डोंबिवली स्थानकावर प्रवाशांची तुफान गर्दी; मनसेच्या नेत्याची स्वायत्त रेल्वे बोर्डाची मागणी
डोंबिवली रेल्वे स्थानकावरील वाढत्या गर्दीचा आणि प्रवाशांच्या हालअपेष्टांचा मुद्दा मनसे नेते आणि माजी आमदार राजू पाटील यांनी थेट सोशल मीडियावर मांडत सरकारला जाब विचारला आहे. “डोंबिवली स्थानकावर रोजचाच हा गोंधळ आहे. सरकारला चाकरमान्यांचे हाल दिसत नाहीत का?” असा थेट सवाल करत त्यांनी महाराष्ट्राचे स्वायत्त रेल्वे बोर्ड स्थापन करण्याची मागणीही केली आहे. राजू पाटील यांनी आपल्या पोस्टमध्ये डोंबिवली स्थानकाची गर्दी दाखवणारे व्हिडिओ देखील शेअर केले आहेत. सविस्तर वाचा…