परतफेडीची गरज नसलेल्या सीएमईजीपी, पीएमईजीपी कर्जाचे आमिष देणाऱ्या प्रियंका व रवींद्र निकम यांच्यासह तिघांना २५ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी (२२ जुलै) तिघांनाही न्यायालयात हजर केले. तेव्हा तिसऱ्यांदा
.
फेडायची गरज नसलेल्या कर्जाचे आमिष, ३०० जणांना गंडा आणि बँकांच्या बनावट पत्रांच्या आधारे प्रियंकाने विश्वास कमवला: गंडवलेल्यांना दिले खोटे चेक-शपथपत्र, या शीर्षकांच्या दोन बातम्या ८ जुलै राेजी ‘दिव्य मराठी’च्या अंकात प्रसिद्ध केल्या होत्या. पुराव्यासाठी पैसे घेतानाचा प्रियंकाचा लाइव्ह व्हिडिओचा क्यूआर कोडही या वृत्तात होता. त्यामुळे प्रियंकाच्या लुबाडणुकीचे सत्रच उघडकीस आले. बातमी प्रसिद्ध झाल्यावर पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते.
मग, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांनी चौकशी करून (१६ जुलै) गुन्हा दाखल केला. प्रियंका व रवींद्र निकमला अटक करून २२ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत डांबले होते. सोमवारी (२१ जुलै) राहुलला अटक केली. राहुलला जिल्हा उद्योग केंद्रातील अधिकारी असल्याचे प्रियंका भासवत होती. नंतर लोकांकडून पैसे काढायची.
तिने गुगल आणि फोन-पे द्वारे ८५ लाख रुपये घेतल्याचे पुरावे आत्तापर्यंतच्या तक्रारदारांनी पोलिसांना दिलेत. ४५ जणांनी आर्थिक गुन्हे शाखेत येऊन तक्रार दिली आहे. प्रियंकाच्या सावंगी येथील सारा परिवर्तनच्या फ्लॅट क्रमांक ७ ची पोलिसांनी झडती घेतली. तिथे बनावट शपथपत्र आढळून आले.
गुन्ह्यातील सर्व साथीदारांना अटक करू
महांडुळे यांनीही ‘दिव्य मराठी’च्या वृत्तावर शिक्कामोर्तब केले. त्यांच्या मते, साधारणत: २५० ते ३०० तक्रारी असल्याचा अंदाज आहे. या गुन्ह्यात ज्यांनी-ज्यांनी प्रियंका आणि रवींद्र निकम यांना साथ दिली, त्यांना अटक होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.