पं. दीनदयाल उपाध्याय मेळाव्यात तरुणांना रोजगार: 79 उमेदवारांची प्राथमिक निवड तर 11 उमेदवारांना मिळाली नोकरी, मान्यवरांची उपस्थिती, मार्गदर्शन‎ – Amravati News



जिल्ह्यातील तरुणांना रोजगाराची दिशा देणारा ”पं. दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा’ श्री गुरुदेव सेवाश्रम गुरुकुंज मोझरी, ता. तिवसा येथे यथे आयोजित करण्यात आला होता.

.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तसेच मॉडेल करिअर सेंटर आणि डाखरे महाराज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या मेळाव्याने अनेक तरुणांना त्यांच्या करिअरसाठी संधी उपलब्ध करून दिली.

उद्योग, उत्पादन, आयटी, विक्री, मार्केटिंग आणि इतर क्षेत्रांतील प्रतिनिधींनी थेट २०२ उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. यापैकी ७९ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली, तर ११ उमेदवारांची अंतिम निवड जागेवरच करण्यात आली. या मेळाव्याची ठळक वैशिष्ट्ये म्हणजे २ हजार उमेदवारांचा सहभाग, ४० प्रमुख कंपन्यांचा सहभाग, ७५ पेक्षा अधिक नोकरीच्या संधी आणि १० वी उत्तीर्ण ते पदवीधर उमेदवारांसाठी हा मेळावा खुला होता. ”गार्डियन्स ट्रेनिंग अकॅडमी, हैदराबाद’, टेक्नोक्राफ्ट प्रा. लि., नांदगाव पेठ, अमरावती’, स्पिनी व्हॅल्युड्राइव्ह टेक्नॉलॉजी प्रा. लि., गुरुग्राम’ फातेमा कॉलेज ऑफ नर्सिंग, तिवसा, अमरावती’ या कंपन्यांनी विविध पदांसाठी मुलाखती घेतल्या. काही उमेदवारांची लगेच निवड झाली, तर काहींची प्राथमिक निवड करण्यात आली.या मेळाव्याचे उद्घाटन गुरुदेव नगरचे उपसरपंच मिलींद काळमेघ यांच्या हस्ते झाले. या वेळी गुरुदेव मानव विकास संस्थेचे अमोल बांबल, गुरुकुल मोझरीचे संचालक रवी मानय ,डाखरे महाराज फाउंडेशनचे संचालक धनंजय डाखरे उपस्थित होते.

रोजगार मेळाव्यामुळे जिल्ह्यातील तरुणांना प्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असून, भविष्यात अधिक व्यापक स्वरूपात अशा उपक्रमांचे आयोजन करून तरुणाईच्या स्वप्नांना दिशा देण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला आहे. मेळाव्याचे संचालन राजूभाऊ हरणे यांनी केले, तर धनंजय डाखरे यांनी आभार मानले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24