काँग्रेस नेते राहुल गांधी हे अति डाव्या विचारसरणीच्या प्रभावाखाली असून त्यांच्या निर्देशामुळे काँग्रेस पक्ष आता महाराष्ट्रातील जन सुरक्षा विधेयकाचा विरोध करीत आहे, असा थेट आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली येथे माध्यमांशी बोलताना केला.
.
पण आता काँग्रेस आंदोलन करीत आहे, कारण राहुल गांधी यांनी तसे आदेश दिले आहेत, असा आरोपही फडणवीस यांनी केला. राहुल गांधी यांना अति डाव्या विचारसरणीच्या प्रभावाखाली आहे. त्यामुळे त्यांचे विचार देखील त्या दिशेने वळले आहेत. आत्ताच्या परिस्थितीमध्ये राहुल गांधी हे अति डाव्या विचारसरणीने ग्रासलेले आहे. अति डाव्या विचारसरणीच्या लोकांनी त्यांना घेरलेले आहे. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा आदेश देताच काँग्रेसने राज्यात आंदोलन सुरू केल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
जनसुरक्षा विधेयकात संदर्भात सयुक्त चिकित्सा समितीमध्ये सांगोपांग चर्चा करण्यात आली. त्यानंतर याचा दुरूपयोग केला जाऊ शकतो वा ते संविधान विरोधी आहे, अशी कुठलीही गोष्ट विधेयकांत नाही हे समिती सदस्यांच्याही लक्षात आले. म्हणून समितीने काही अनुषंगिक बदल सुचवले. ते आम्ही ऐकले. त्याथ्नंतर विधेयक सभागृहात पारित झाले.
शहरी नक्षलींचा खोटा प्रपोगंडा
गडचिरोलीत वेगवेगळ्या प्रकारचे प्रपोगंडा पसरवण्यात येत आहे. लाखो वृक्षतोड झालेली आहे, आदिवासींच्या जमिनी बळकावण्यात आल्या आहे, काही लोकांना यमसदनीही पाठवले आहे, अशा प्रकारच्या खोट्या अफवा पसरवण्यात आल्या. या अफवांचे मूळ शोधले असता काही कोलकात्याहून, काही बंगलोरमधून असल्याचे लक्षात आले. त्यामुळे भारताचा आणि महाराष्ट्राचा तसेच गोरगरीब आदीवासींचा विकास होऊ नये अशी कारस्थाने शहरी नक्षलवादी संघटना करीत आहे. पण, त्यांच्या कारस्थानाला आम्ही कृतीतून उत्तर देत आहो. लाॅयडसमध्ये लागलेल्या १४ हजार लोकांपैकी ९९ टक्के दलित, आदीवासी आहे.