कल्याणमधील नांदीवली परिसरात अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका खासगी रुग्णालयातील रिसेप्शनिस्टला एका परप्रांतीय तरुणाने अमानुष मारहाण करण्यात आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून यात रिसेप्शनिस्ट मुलीला गंभीर दुखापत झाली आहे. हल्ला करणाऱ्याच
.
गोपाल झा या मारहाण करणाऱ्या तरुणाला रिसेप्शनिस्ट तरुणीने इतकेच म्हटले होते की डॉक्टरांच्या केबिनमध्ये एमआर बसले आहेत, तुम्ही जरा वेळ थांबा. त्यावरून या गोपाल झाने बेदम मारहाण केली. धावत येऊन त्याने रिसेप्शनिस्टवर उडी मारत पायाने जोरदार लात मारली. तसेच तिला खाली पाडत बेदम मारहाण केली. यावेळी उपस्थित लोकांनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे.
रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मानपाडा पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. या घटनेने पीडित मुलीच्या मनात चांगलीच भीती निर्माण झाली असून गंभीर दुखापत देखील झाली आहे. कल्याण पूर्व येथील पिसवाली येथील ही रहिवासी असून सोनाली प्रदीप कळासारे असे तिचे नाव आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यावर एकच संताप व्यक्त केला जात आहे. कल्याण पूर्व येथील श्री बाल चिकित्सालय येथे ही पीडिता रिसेप्शनिस्ट म्हणून काम करते.
नेमके काय घडले?
डॉक्टरांच्या आदेशानुसार, डॉक्टरांच्या केबिनमध्ये (कन्सल्टिंग रूममध्ये) एमआर बसलेले असताना कोणालाही आत प्रवेश देऊ नये, अशा स्पष्ट सूचना दिल्या होत्या. या नियमाचे पालन करत असताना, एक नशेच्या अवस्थेत असलेला तरुण कोणाचाही अडथळा न मानता थेट डॉक्टरांच्या केबिनमध्ये घुसला. त्यावेळी त्याला थांबवून “आत जाऊ नका” असे सांगितल्यामुळे, संतप्त होऊन त्याने मला धावून येत तोंडावर लाथ मारली आणि जमिनीवर पाडले. त्यानंतर माझे कपडे फाडून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली, अशी माहिती पीडित तरुणीने दिली आहे.
हा प्रकार 21 जुलै 2025 रोजी सायंकाळी साडेसहा वाजता घडला. या प्रकरणी पीडित तरुणीने मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मात्र, तक्रार दाखल केल्यानंतरही संबंधित नशेखोर तरुण माझ्या राहत्या परिसरात वारंवार दिसून येत आहे, अशी माहिती सोनाली कळासारे यांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर, आरोपीला तातडीने अटक करावी आणि पीडितेला न्याय द्यावा, अशी मागणी तिच्या सहकाऱ्यांनी आणि नातेवाइकांनी केली आहे. तसेच मनसे नेते अविनाश जाधव या पीडित तरुणीची भेट घेणार असल्याची माहिती आहे.