काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार राहुल गांधी हे अति डाव्या विचारसरणीने ग्रस्त असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीने सादर करण्यात आलेल्या जन सुरक्षा विधेयकाला आता काँग्रेस विरोध करत आहे. या प्रश्नावर
.
या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, जन सुरक्षा विधेयक तयार करण्यात आल्यानंतर त्यातील प्रत्येक मुद्द्यावर संयुक्त चिकित्सा समितीच्या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यामुळे काँग्रेसला देखील या विधेयकावर कोणताही आक्षेप नव्हता. त्यानंतरच हे विधेयक विधिमंडळात मंजूर करण्यात आले आहे.
मात्र आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आदेश दिल्यामुळे महाराष्ट्रातील नेत्यांपुढे कोणताच पर्याय राहिला नाही. त्यामुळे ते आता या जन सुरक्षा विधेयक विरोधात आंदोलन करत आहेत. राहुल गांधी यांना अति डाव्या विचारसरणीच्या लोकांनी घेरलेले आहेत. त्यामुळे ते अति डाव्या विचारसरणीने ग्रस्त झाले असल्याची टीका देखील फडणवीस यांनी केली आहे.
आम्ही हे वृत्त अपडेट करत आहेत….