शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी शनिवारी संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुप्तपणे भेट घेतली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघेही वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी मुंबईतील सोफिटेल हॉटेलमध्ये 3 तास होते. यादरम्या
.
दरम्यान, आमच्यामध्ये कोणतीही भेट झाली नसल्याचे दोन्ही नेत्यांकडून सांगण्यात आले. मुख्यमंत्री कार्यालयाच्या म्हणण्यानुसार, मुख्यमंत्री हॉटेलमध्ये उपस्थित होते, परंतु त्यांनी आदित्य ठाकरे यांची भेट घेतली नाही. मुख्यमंत्री दुसऱ्या काही कार्यक्रमासाठी हॉटेलमध्ये आले होते, तर आदित्य त्यांच्या मित्रांसह जेवणासाठी हॉटेलमध्ये उपस्थित होते.
नेमके काय म्हणाले आदित्य ठाकरे?
देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या भेटीच्या चर्चांवर आदित्य म्हणाले, मी माझ्या मित्रांसोबत डिनरसाठी आणि एक संगीत कार्यक्रम होता त्यासाठी आलो होतो. मी कार्यक्रमात असतानाही या बातम्या पाहत होतो. या बातम्या पाहून एक व्यक्ती आता गावाला जाईल असं वाटतंय. चाललंय ते चालू द्या.
आदित्य ठाकरे यांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे. कारण जेव्हा-जेव्हा एकनाथ शिंदे नाराज असतात तेव्हा ते गावाला जातात, अशी टीका ठाकरे गटाकडून वारंवार केली जाते. त्यामुळे आताही आदित्य ठाकरे यांनी हॉटेलमधून बाहेर पडताना एकनाथ शिंदे यांना डिवचल्याचं दिसत आहे.
सुतावरून स्वर्ग गाठणे योग्य नाही – सुषमा अंधारे
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी याबाबत बोलताना म्हटले की, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे हॉटेलमध्ये गेल्याच्या बातम्या आपण दाखवत आहात. मात्र हे स्पष्ट केले पाहिजे की, हे दोन्ही नेते वेगवेगळ्या कारणासाठी त्या ठिकाणी गेले होते. त्यानंतर त्या दोघांची भेट योगायोगाने झाली. दोन्ही नेते समोरासमोर आले तर अभिवादन करणे नमस्कार करणे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. हे फार स्वाभाविक आहे. लगेचच सुतावरून स्वर्ग गाठणे हे योग्य नाही.
हे ही वाचा…
देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरे मुंबईतील एकाच हॉटेलमध्ये:चर्चांना उधाण; वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी आले, दोघांची भेट झाली नसल्याची सूत्रांची माहिती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे एकाच हॉटेलमध्ये असल्याची माहिती शनिवारी रात्रीच्या सुमारास माध्यमांतून समोर आली. मुंबई उपनगरातील सॉफिटेल हॉटेलमध्ये हे दोन्ही नेते एकत्र आल्याची माहिती समोर आल्यानंतर या दोघांची भेट झाल्याची चर्चा माध्यमांमध्ये सुरू झाली. दरम्यान, दोन्ही नेते एकाच हॉटेलमध्ये गेले असले तरी ते वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी त्या हॉटेलमध्ये गेल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी भाजपच्या सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. तसेच दोन्ही नेत्यांची भेट झाली नसल्याचे स्पष्टीकरण भाजपच्या सूत्रांनी दिले. पूर्ण बातमी वाचा…