वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी विधिमंडळाच्या महिला व बालहक्क समितीने चौकशी अहवाल सादर केला असून, वैष्णवीचा मृत्यू फक्त आत्महत्या नसून कौटुंबिक हिंसाचार व हुंड्याच्या छळातून उद्भवलेली हुंडाबळी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. समितीच्या या अहवालावरून राष्ट
.
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सरकारच्या वतीने आमदार मोनिका राजळे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने शुक्रवारी विधानसभेत आपला अहवाल सादर केला. या अहवालात तपास प्रक्रियेत गंभीर त्रुटी असल्याचे नमूद केले आहे. हा प्रकार केवळ आत्महत्येचा नसून, हे प्रकरण स्पष्टपणे कौटुंबिक अत्याचार, हुंडाबळी व अमानुष छळाचे असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे. समितीच्या अहवालावरून रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून सरकारला धारेवर धरले आहे.
पोस्टमध्ये काय म्हणाल्या रोहिणी खडसे?
वैष्णवी हागवणे प्रकरणात पोलिसांकडून कारवाईची अपेक्षा असताना पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. असं मी म्हणत नाही तर आ. मोनिका रांजळे यांच्या अध्यक्षतेखाली सरकारने स्थापन केलेली समिती म्हणत आहे.
काल विधानसभेत या समितीने आपला अहवाल सादर केला. त्यात म्हटले आहे की, सुपेकर आणि त्यांच्या कुटुंबावर कारवाई करावी आणि त्याची माहिती समितीला द्यावी, असे स्पष्ट निर्देश समितीने गृह विभागाला दिलेले होते. मात्र, हा अहवाल विधानसभेत सादर होईपर्यंत कोणतीही माहिती समितीला दिली गेली नाही.
अरे कुणाला मूर्ख बनवता? सध्या पोलिस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचत आहेत. असे असताना ‘आपल्याच’ माणसांवर का कारवाई करतील? मी आधीच म्हटले होते, प्रकरण ताजे असेपर्यंत आम्ही काहीतरी करतोय असे दाखवले जाईल, प्रकरण शांत झाले की आरोपींना व्हिआयपी ट्रिटमेंट दिली जाईल आणि तसंच घडतंय!
शासनाला जनाची नाही तर मनाची असेल, तर वैष्णवीच्या आत्म्याचा विचार करा, तिच्या लहान बाळाचा विचार करा? असे रोहिणी खडसे यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे.
हे ही वाचा…
वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरण:विधिमंडळ समितीचा चौकशी अहवाल समोर; तपासात गंभीर त्रुटी, सुपेकरांवर कारवाईची शिफारस
वैष्णवी हगवणे यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी विधिमंडळाच्या महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समितीने प्रथम अहवाल सादर करत तपास प्रक्रियेत गंभीर त्रुटी असल्याचे नमूद केले आहे. हा प्रकार केवळ आत्महत्येचा नसून, हे प्रकरण स्पष्टपणे कौटुंबिक अत्याचार, हुंडाबळी व अमानुष छळाचे असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे तपासाची दिशा बदलून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी शिफारस करण्यात आली आहे. पूर्ण बातमी वाचा…