‘राज ठाकरेंसोबत जो जाणार तोही संपणार’, मनोज तिवारींनी डिवचलं


Manoj Tiwari On Raj Thaceray: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मराठी-हिंदी वाद पेटला आहे. अशातच राज ठाकरे यांनी मराठीच्या मुद्द्यावर आंदोलन करण्याचा इशारा देताच राज्य सरकारने हिंदी सक्तीची निर्णय मागे घेतला. त्यानंतर राज-उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत विजयी मेळावा घेतला. दोघेही एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात देखील प्रचंड चर्चा रंगली. अशातच आता भाजपचे खासदार मनोज तिवारी यांनी आता राज ठाकरे यांना चांगलंच सुनावले आहे. त्यांनी थेट राज ठाकरेंचं नाव घेऊन म्हणाले की, राज ठाकरे यांच्यासोबत जो जाईल तोही संपणार असं ते म्हणाले. 

नेमकं काय म्हणाले मनोज तिवारी? 

मनोज तिवारी यांना राज ठाकरे यांच्या संदर्भात एक प्रश्न विचारताच त्यांनी या देशाची आणि महाराष्ट्राची जी प्रांतीय एकता आहे. ती भाषिक एकता आहे. जी तोडण्याचा प्रयत्न राज ठाकरे करत आहेत. त्यामुळे त्यांना जे बोलायचे आहे ते त्यांनी बोलावे. पण त्यांनी एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी. जो व्यक्ती राजकारणाच्या कचराकुंडीत गेला आहे त्याला पुन्हा जीवंत करण्याचा प्रयत्न कोणत्याही टीकेने होणार नाही अशी मी प्रार्थना करतो. त्यांना महाराष्ट्राची जनता कुठेही उभं करणार नाही. 

जे राज ठाकरेसोबत जातील तेही राजकारणातून नष्ट होतील. कारण हा महाराष्ट्रातील लोक, मराठी भाषेचे पालन योग्य पद्धतीने करत आहेत. राज ठाकरे यांच्या इतका कोणताही मराठी माणूस संस्कृतीचा आदर करू शकत नाही. पण तेच लोक मराठी संस्कृतीचा अनादर करत आहेत. ज्यामध्ये राज ठाकरे देखील आहेत असं मनोज तिवारी यांनी म्हटलं.  त्यावर आता राज ठाकरे मनोज तिवारी यांच्यावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहावे लागेल. 

निशिकांत दुबेंना राज ठाकरेंनी थेट आव्हान

आता भाजप खासदार निशिकांत दुबेंना राज ठाकरेंनी थेट आव्हान दिलं आहे. पटक पटक के मारेंगे म्हणणाऱ्या दुबेंनी मुंबईत यावं त्यांना डुबो डुबो के मारेंगे असा इशाराच राज ठाकरेंनी दिला. मिरा रोडच्या सभेत राज ठाकरेंनी मराठी भाषेसाठी आपण शेवटपर्यंत लढणार असल्याचा निर्धार केला. शिवाय भाजप खासदार निशिकांत दुबेंनाही सुनावलं. 





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24