राज्याच्या ऊर्जा क्षेत्रात नवसंशोधन, आधुनिक धोरणनिर्मिती आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याला चालना देणारा ऐतिहासिक टप्पा गुरुवारी गाठण्यात आला. महाराष्ट्र शासन आणि कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कले यांच्यात ऊर्जा संशोधन आणि धोरण विकास या क्षेत्रात सामंजस्य करा
.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विधानभवनातील मंत्रिमंडळ सभागृहात हा करार झाला. यावेळी ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, तसेच महावितरण, महानिर्मिती व महापारेषणचे वरिष्ठ अधिकारी आणि कॅलिफोर्निया विद्यापीठाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
राज्याच्या उर्जाक्षेत्राला जागतिक सहकार्याची साथ या सामंजस्य करारामुळे महाराष्ट्राच्या ऊर्जा क्षेत्रात अनेक महत्त्वपूर्ण बाबींवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. त्यात
- ऊर्जा साठवणूक प्रणालींचे तांत्रिक संशोधन
- स्वच्छ, विश्वासार्ह आणि परवडणाऱ्या विजेचा विकास
- वीज बाजार रचना आणि धोरणात्मक सुधारणा
- ग्रीड व प्रसारण यंत्रणांमध्ये नवोन्मेष
- हवामान बदलाशी जुळवून घेणारी धोरणे
- कौशल्यविकास आणि प्रशिक्षण उपक्रम
महाराष्ट्र बनणार जागतिक ऊर्जा केंद्र- मुख्यमंत्री
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कॅलिफोर्निया विद्यापीठासारख्या नावाजलेल्या संस्थेशी सहकार्यामुळे महाराष्ट्रातील ऊर्जा क्षेत्रात जागतिक दर्जाचे संशोधन आणि धोरणात्मक काम सुरू होणार आहे. हा करार म्हणजे स्वच्छ, विश्वासार्ह आणि शाश्वत ऊर्जा क्षेत्राच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे.
स्थानिक गरजांनुसार उपाययोजना
ऊर्जा क्षेत्रात स्थानिक पातळीवरील आव्हानांना तोंड देण्यासाठी हा करार लवचिक स्वरूपाचा असून भविष्यातील विविध प्रकल्पांनुसार सहकार्याच्या संधी खुल्या राहतील. राज्यातील विद्यापीठे, संशोधन संस्था आणि ऊर्जा कंपन्यांना यातून जागतिक दर्जाचे ज्ञान आणि प्रशिक्षण मिळेल.
ऊर्जा विभागाची भूमिका ठळक
ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठाचे वरिष्ठ सल्लागार मोहित भार्गव यांच्यासोबत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या वेळी बोलताना शुक्ला म्हणाल्या, हा करार केवळ धोरणात्मक नाही, तर कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. यामुळे ऊर्जा क्षेत्रातील प्रत्येक घटकाला जागतिक संधी लाभणार आहेत.