दीपनगर येथील श्री शारदा माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांना वाहतूक नियम, सायबर गुन्हे, मोबाइलच्या दुष्परिणामांबाबत जागरूक करण्यात आले. स्थानिक पोलिस दलातील अधिकारी, पालक प्रतिनिधी आणि आरोग्य तज्ज्ञ उपस्थित होते.
.
पोलिस हवालदार महेश चौधरी, मनोज येऊलकर, जितेंद्र ठाकरे, लीना लोखंडे, महिला पालक प्रतिनिधी रूपाली पवार, दीपनगर आरोग्य विभागाचे डॉ. प्रशांत जाधव, श्री शारदा शिक्षण मंडळाचे संचालक सदस्य स्वप्निल पाटील, प्राचार्य जे. बी. पाटील यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन एन. ए. नेहेते यांनी केले. हवालदार मनोज येऊलकर यांनी, शाळेतील तक्रारपेटीचा प्रभावी वापर करण्यावर भर दिला. विद्यार्थ्यांनी न घाबरता आपल्या तक्रारी पेटीत टाकाव्या असे आवाहन केले. अशा तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे आश्वासन दिले. नंतर मोबाइलच्या अतिवापराचे दुष्परिणाम समजावून सांगितले. नंतर जितेंद्र ठाकरे यांनी सायबर धोक्यांपासून कसे सुरक्षित राहावे ही माहिती दिली. संस्थेचे अध्यक्ष पी. एस. कवठे व माध्यमिक विभागाचे चेअरमन उन्मेश पाटील यांनी विद्यार्थी सुरक्षेविषयी विशेष चर्चा केली. मुख्याध्यापक जे. बी. पाटील यांनी वाहतूक नियमांची माहिती दिली. शिक्षकांनी सहकार्य केले.