CM devendra Fadnavis: 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरोधात बंड पुकारले आणि शिवसेनेत फूट पडली. शिंदे यांनी 40 हून अधिक आमदारांसह पक्ष सोडला आणि भाजपसोबत महायुतीत सहभागी झाले. यामुळे शिवसेनेत दोन गट पडले. एकनाथ शिंदे यांचा गट आणि उद्धव ठाकरे यांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट. निवडणूक आयोगाने 2023 मध्ये शिंदे गटाला “शिवसेना” नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिले, तर ठाकरे गटाला “मशाल” चिन्ह मिळाले. याबाबतचा वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना सत्तेत येण्यासंदर्भात ऑफर दिल्याची चर्चा आहे. अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभाच्या भाषणावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टोलेबाजी पाहायला मिळाली.
उद्धव ठाकरे यांनी सत्तेत सहभागी होण्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात ऑफर दिली. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून थेट ऑफर देण्यात आली. उद्धवजी 2029 पर्यत काहीही स्कोप नाही. आम्हाला त्या बाकावर यायचा स्कोप नाही, तुम्हाला इथं यायचं असेल तर बघा, स्कोप आहे. ते आपण वेगळ्या पद्धतीने बोलू असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपत आला आहे. अनिल परब तुम्ही आता तयारी करा. दानवे वेगवेगळे योग जुळवून आणतात…. संजय केणेकर यांचा विवाह युग देखील त्यांनी जुळवला. हिंदुत्ववाची कडवट भूमिका घेणारा कार्यकर्ता म्हणजे दानवे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. भोंग्यांविरोधात त्यांनी अनेक निवेदन दिले.ते कट्टर सावरकर आहेत..जरीही बंटी पाटील यांच्या बाजूला ते बसले असतील तरीही ते भक्त असतील पवार साहेबांचा कधीही सावरकरांना विरोध न्हवता, असेही ते म्हणाले.
उद्धवजी तुम्ही तिथे राहून राहुलजींना समजावा. इंदिरा गांधी यांनीही पत्र लिहिल होत सावरकरांना. अभिनव आंदोलने करण्याचं काम त्यांनी केलंय
छत्रपती संभाजीनगर नामकरण आम्ही केलंय, असे फडणवीस म्हणाले. ते नामकरण आम्ही केलंय असं उद्धव ठाकरे म्हणाले. पण तुमच्याकडे बहुमत सिद्ध करायची वेळ आली तेव्हा तुम्ही ते नामकरण केलं असे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं.उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात छत्रपती संभाजीनागरच्या नामांतरावरून कलगीतुरा पाहायला मिळाला.
आम्हाला तिकडे (विरोधी पक्षात) जाण्याचा स्कोप 2029 पर्यंत नाही, पण तुमचा इकडं यायचा स्कोप आहे का? यावर वेगळ्या पद्धतीने बोलू असे मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटले.