पावसाळ्यात टेपवर्म्सच्या संसर्गात वाढ



पालघर, ठाणे (thane) आणि मुंबईत (mumbai)  पावसाळ्याचे दिवस असल्याने मीरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटल्सने टेपवर्म्सच्या (tapeworms) संसर्गात लक्षणीय वाढ झाल्याबद्दल गंभीर आरोग्य सतर्कता जारी केली आहे.

रुग्णालयातील कन्सल्टंट इंटरव्हेंशनल न्यूरोलॉजिस्ट डॉ. पवन पै यांनी न्यूरोसिस्टिसकोसिसच्या गंभीर धोक्यांबाबत माहिती दिली आहे. या विषाणूमुळे मेंदूचा गंभीर संसर्ग होतो. ही स्थिती अनेकदा दूषित अन्न आणि पाण्यामुळे होते.

“पावसाळ्यात लोक मूलभूत अन्न स्वच्छतेकडे दुर्लक्ष करतात, परंतु कमी शिजवलेले डुकराचे मांस आणि अयोग्यरित्या धुतलेल्या भाज्या हे टेपवर्म अळ्यांचे सामान्य वाहक आहेत,” डॉ. पै यांनी स्पष्ट केले.

संसर्गाच्या धोक्यामुळे त्यांनी पुढे सांगितले की, “हे विषाणू शरीरात गेल्यावर मेंदूवर प्रहार करतात. ज्यामुळे चक्कर, डोकेदुखी तसेच मेंदूची क्षमता कमकुवत होऊ शकते तसेच न्यूरोलॉजिकल हानी देखील होऊ शकते.”

पावसाळ्याशी संबंधित पुराच्या वाढत्या घटना आणि त्यासोबतच स्वच्छतेतील बिघाड यामुळे अशा संसर्गाचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो. डॉ. पै यांनी नमूद केले की मुले आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्ती या विषाणूबाबत विशेषतः संवेदनशील असतात.


हेही वाचा

कांदिवली, मालाडमधील ‘या’ 7 पुलांची होणार पुनर्बांधणी

मेट्रो 2 आणि 7 मार्गावर मेट्रोच्या 2 अतिरिक्त फेऱ्या वाढल्या



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24