महाराष्ट्र सरकार लवकरच महाविद्यालये आणि खासगी कोचिंग क्लासेस यांच्यातील साटेलोटे मोडून काढण्यासाठी नवीन कायदा आणणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी बुधवारी विधानसभेत केली. हा कायदा महाविद्यालयांची जबाबदारी निश्चित करेल आणि शैक्षणिक
.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. सभागृहात उत्तर देताना शिक्षणमंत्री भुसे म्हणाले की, पालकांची आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी शाळांद्वारे शिक्षण शुल्काशिवाय घेतल्या जाणाऱ्या इतर शुल्कांवर मर्यादा आणण्यासाठी नियमातही बदल केला जाईल.
१६ बी.एड. महाविद्यालयांची मान्यता केली रद्द
राज्यातील १६ बी.एड. महाविद्यालयांची मान्यता रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती उच्च व तांत्रिक शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत दिली. या महाविद्यालयांनी अनिवार्य मूल्यांकन अहवाल वेळेत सादर न केल्यामुळे ही कठोर कारवाई करण्यात आली आहे. या संस्थांपैकी ७ महाविद्यालयांनी आपले कामकाज पूर्णतः बंद केले आहे. यामुळे सुमारे ५०० विद्यार्थी अडचणीत आले होते. मात्र, या विद्यार्थ्यांना इतर मान्यताप्राप्त महाविद्यालयांमध्ये प्रवेश देऊन समायोजित केले जाईल त्यांनी स्पष्ट केले.