भरलेल्या ताटाशी प्रतारणा केली नाही; एका वाक्यात उद्धव ठाकरे यांनी अंबादास दानवेंची कारकिर्द मांडली


Ambadas Danve Uddhav Thackeray :  विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते  अंबादास दानवे यांचा कार्यकाळ पूर्ण होणार आहे. ऑगस्ट 2025 मध्ये  अंबादास दानवे निवृत्त होणार आहेत. अंबादास दानवे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आहेत. विधान परिषदेत अंबादास दानवे यांचा निरोप समारंभ झाला. भरलेल्या ताटाशी प्रतारणा केली नाही… असं म्हणत एका वाक्यात उद्धव ठाकरे यांनी अंबादास दानवे यांची कारकिर्द मांडली. 

मुख्यमंत्री पदाइतकचं विरोधी पक्ष नेते पद महत्वाचे आहे. अंबादास दानवेंचा  विरोधीपक्षनेता पद म्हणून कायम अभिमान वाटेल.  विरोधीपक्ष नेता आक्रमक असला पाहिजे. विरोधपक्ष नेता म्हणून अंबादास दानवेंची नाव आवर्जून घेतले जाईल असे उद्धव ठाकरे म्हणाले.   अनेक जण सोन्याचा चमचा घेऊन आले नाही. पण भरलेल्या ताटाशी प्रतारणा केली नाही.  माझ्या ताटात आहे ते माझं, इतरांचेही माझं असं ते म्हणाले नाहीत. 

पदं येतात पद जातात. अंबादास दानवे म्हणाले तुम्ही दिलं ते खुप आहे, पद टिकवण्यासाठी त्यांनी कधी मागणी केली नाही आणि तडजोड केली नाही. नाहीतर आता काय पावसाळा आहे. कुणी कुठेही उड्या मारू शकतात. दानवे सारखे कार्यकर्ते स्वतः एक उंची प्राप्त करतात. भाजप आमदार प्रविण दरेकर यांनी अंबादास दानवे यांना निरोप देताना उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.  उद्धवजींनी आजही टोमणे मारले.  महाराष्ट्राने भरून दिलेलं ताट कुणी हिरावलं हे राज्याने पाहिलं. फडणवीस म्हणाले पुन्हा येईण आणि ते पुन्हा आले, ताठ मानेने आले.  उद्धव ठाकरेंना शिंदेंच्या सोबतचे लोक तुम्हाला टिकवता आले नाही. 

सोन्याचा चमचा घेऊन दानवे जन्माला आले नाहीत. लोकसभेची उमेदवारी दिली असती तर ते खासदार झाले असते. वाईटातून चांगलं होतं. दानवेंनी पक्ष बदलले पण विचारधारा बदलली नाही, हिंदुत्वाशी प्रतारणा केली नाही.  दुष्काळात, अपघातात कुठेही आपत्तीत ते पोहोचायचे. अकोल्याला दंगल झाली तेव्हा ते जातीने हजर राहिले.   मेळघाटात आदिवासींसोबत त्यांनी संवाद केला. शिंदे साहेब, त्यांना (उद्धव ठाकरेंना) जमलं नाही तर तुम्ही त्यांची काळजी घ्या, तुम्ही शिवसैनिक आहात. तुम्ही ठरवलं असतं तर संजय राऊत आणि अंबादास दानवेंचा टांगा पलटी करू शकला असतात पण तुम्ही प्रामाणिक आहात असं म्हणत प्रविण दरेकर यांनी अंबादास दानवे यांचे कौतुक केले. 
 





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24