धाकट्या पंढरीत आर्थिक गैरव्यवहार? महंत शिवाजी महाराजांचे आरोप; वारकरी संप्रदायात खळबळ . .


महेंद्र मुधोळकर, झी मीडिया, बीड : मराठवाड्यातील लाखो वारक-यांसाठी धाकटी पंढरी असं श्रद्धास्थान असणा-या  नारायणगडाचा वाद आता कोर्टात गेला आहे. गडासाठी येणा-या निधीच्या वापरासाठीच्या निघणा-या टेंडरचा वाद निर्माण झालाय. महंत शिवाजी महाराजांनी यासंदर्भात गंभीर आरोप करत ट्रस्टवरील पदाधिका-यांना दोषी ठरवले. 

धाकट्या पंढरीत, बीडच्या नारायणगडावर आर्थिक गैरव्यवहार ? ट्रस्टवरील दोन पदाधिका-यांकडूनआर्थिक घोटाळा,  महंत शिवाजी महाराजांचे आरोप आहेत. नारायणगडावर भ्रष्टाचाराचे आरोप, वारकरी संप्रदायात खळबळ उडाली आहे. 

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पहिला भव्य दिव्य दसरा मेळावा बीडच्या श्रीक्षेत्र नारायण गडावर घेतला आणि तेव्हापासून  नारायण गडाची राज्यात चर्चा  होऊ लागली आहे. मराठवाड्यातील लाखो भाविकांच्या या धाकट्या पंढरीत, नारायण गडावर आर्थिकबाबीत गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप गडाचे मठाधिपती शिवाजी महाराज यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे. 

ट्रस्टचे पदाधिकारी बळीराम गवते आणि भानुदास जाधव यांच्याकडून  आर्थिक गैरव्यवहार झाले. गडावर पंचवीस कोटीच्या विकास कामाचा आराखडा निधी मंजूर करण्यात आला. गडासाठी निधी दिवंगत नेते विनायक मेटे यांनी आणलेला होता. मात्र टेंडर मिळवण्यासाठी गवते आणि जाधवांचा आग्रह होता. मात्र टेंडर न दिल्याने बदनामी करत त्यांनी कोर्टात चुकीची माहिती दिली.

ट्रस्टचे पदाधिकारी बळीराम गवते आणि भानुदास जाधव यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप झाल्यांनंतर, उलट या प्रकरणात  महंत शिवाजी महाराजांनी ते टेंडर कोणाला दिले याचे सर्व पुरावे असल्याचं सांगत आरोपांचं खंडन केलंय. व्हिडिओ-ऑडिओसह पत्रकरा परिषदेत याबाबत पुरावे सादर करू असा दावा बळीराम गवते यांनी केला आहे

मराठवाड्यातल्या लाखो वारक-यांचं  श्रद्धास्थान असलेले नारायणगडावर आलेल्या निधीबाबत, भाविकांनी दिलेल्या देणग्यांबाबत स्वता महंतांनी केलेल्या या आरोपानंतर वारकरी सांप्रादायातही खळबळ उडालीय. 
आता याप्रकरणातील चौकशीकडे नारायणगडाचे लाखो भाविकांचं लक्ष असेल.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24