तालुक्यात पावसाने विश्रांती घेतल्यामुळे कोळपणी, निंदनी, वखरटी, पिकांच्या वाढीसाठी खत देणे, फवारणी इत्यादी मशागतीच्या कामांमध्ये शेतकरी मग्न झाले आहेत. सततच्या पावसामुळे शेतीची आंतर मशागतीची कामे करण्यास वेळ मिळत न होता परिणामी पिकांचे नुकसान होताना द
.
तणनाशकांच्या फवारण्या, इत्यादी कामांना तालुक्यातील वेग आला आहे. त्यातच कापूस, मका, सोयाबीन या पिकावर गेल्या पंधरवड्यात ढगाळ वातावरण राहिल्यामुळे विविध आजारांनी व किडींनी प्रादुर्भाव केल्यामुळे कीटकनाशकांच्या फवारणी, तसेच रासायनिक खतांच्या पाळ्या देणे. इत्यादी कामे शेतकरी वर्गांकडून सुरू आहेत.
यावर्षी तालुक्यात कापूस पिक पेरा कमी होऊन मका पिकाचा पेरा वाढला आहे. एकूण लागवडीचे क्षेत्र ३८ हजार हेक्टर इतके असून यामध्ये मकाचे सर्वसाधारण क्षेत्र ४ हजार ८२७ हेक्टर असे होते. यावर्षी मक्याचा ९ हजार ८८३ हेक्टवर पेरणी झाली आहे. तर कापसाचे साधारण क्षेत्र २७ हजार २३८ हेक्टर एवढे होते. यावर्षी २० हजार ४७३ हेक्टर एवढे झाले आहे. सोयाबीनचे क्षेत्र २६४८ हेक्टर इतके आहे. उडीद ३३८ हेक्टर, मुग ११८६ हेक्टर होते. उडीद ३३६ हेक्टर इतकी पेरणी झाली आहे.