घटकपक्षांना बरोबर घेऊन ‘समता’चे काम सुरु राहणार- समीर भुजबळ – Ahmednagar News



समता, सामाजिक न्याय आणि संघटन बळकटीकरणाच्या दिशेने निर्धार अधिक दृढ करावा, तसेच ओबीसी समाजाच्या हक्कांच्या लढ्याला अधिक बळकटी देण्यासाठी व संघटनेचे कार्य सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी, प्रत्येक समता सैनिकाने जबाबदारीने आणि झोकून देऊन काम करावे. ओ

.

अखिल भारतीय अहिल्यानगर जिल्ह्यांतील ओबीसी संघटनांचे पदाधिकारी व समता सैनिकांची आढावा बैठक नगर शहरात शासकीय विश्रामगृह येथे भुजबळ यांच्या अध्यक्षततेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कार्याध्यक्ष बापू भुजबळ,माजी आमदार पांडुरंग अभंग, घनश्याम शेलार, अंबादास गारुडकर, अनिल निकम, भगवान फुलसौंदर,डॉ. नागेश गवळी, सुभाष लोंढे, अमित खामकर ,विशाल वालकर आदी उपस्थित होते.

भुजबळ म्हणाले, सध्या प्रत्येक जिल्ह्यात बैठकीचे आयोजन करण्यात येत आहे. त्यामाध्यमातून जे जुने सहकारी आहेत त्यांना एकत्र करणे तसेच संघटना मजबूत करणे आदी बाबतीत त्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांशी विविध विषयांवर सखोल संवाद साधत, संघटनेच्या भविष्यातील वाटचालीबाबत मते जाणून घेतली. या बैठकीत ओबीसी संघटनाचे पदाधिकारी व समतासैनिकांकडून आलेल्या मार्गदर्शक आणि रचनात्मक सूचना हे संघटनेच्या भविष्याचा मार्ग उजळवणारे आहेत. या सूचनांचा अभ्यास करून त्यांचा अंमल करण्यात येईल, याची खात्रीही यावेळी देण्यात आली. यावेळी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच लवकरच शहर महानगर अध्यक्षाची निवड केली जाईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24