चक्क झेडपीच्या शाळेत जर्मन, जपानी भाषेचे धडे


Japanese and German Language in ZP School : आजकालचे पालक हे त्यांच्या मुलांना झेडपीच्या शाळेत टाकण्याआधी खूप विचार करतात. त्यांची इच्छा असते की त्यांच्या मुलांनी चांगल्या शाळेत शिकावं आणि फाड फाड इंग्रजी बोलावं. त्यासाठी ते त्यांना सीबीएसई आणि आयसीएसईच्या शाळांमध्ये टाकतात. जेणेकरून त्यांना चांगला एक्सपोजर मिळेल. पण आता तसं नसून झेडपीच्या शाळेत देखील आता मुलांना चांगलं शिक्षण मिळू लागलं आहे. जिल्हा परिषदेची शाळा नको रे बाबा… अशी प्रतिक्रीया अनेक पालकांची असते. पण नाशिकच्या येवला तालुक्यातील अंदरसुल इथली जिल्हा परिषदेची शाळा अशा पालकांच्या डोळ्यांत अंजन घालणारी आहे. असं काय आहे या शाळेत जाणून घ्या.  

झेडपीच्या शाळेत चक्क जर्मन, जपानी भाषेचे धडे शिकवण्यात येत आहेत. अंदरसुलच्या मुलींना जर्मन,जपानी भाषेची गोडी निर्माण झाली. तर पाचवीच्या मुली फाडफाड जपानी बोलतात. फाडफाड जपानी भाषेत बोलणाऱ्या या मुली जिल्हा परिषदेच्या शाळेतील आहेत. ही शाळा पुण्या-मुंबईतली नाही तर ती आहे नाशिकच्या येवला तालुक्यातील अंदरसुल या गावातली आहे. खाजगी शाळांच्या स्पर्धांमध्ये एकीकडे  जिल्हा परिषद शाळा मागे पडत असताना, अंदरसुलच्या जिल्हा परिषदेची शाला मात्र याला अपवाद ठरली आहे. इथल्या आदर्श जिल्हा परिषद कन्या शाळेत पाचवीच्या मुलींना मराठी, हिदी इंग्रजीसोबतच जपानी आणि जर्मन भाषा शिकवली जाते. त्यामुळे शाळेत येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचं या मुली जपानी किंवा जर्मन भाषेत स्वागत करतात. इतकच नाही तर जपानी भाषेतून स्वताची ओळखही करुन देतात.

जर्मन आणि जपानी या दोन्ही भाषा तशा शिकण्यास अवघड. मात्र, इथले शिक्षक या मुलींसाठी कठोर परिश्रम घेतात. मुलींना भाषेची गोडी लागावी यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवतात. विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत टिकाव लागावा यासाठी इथल्या शिक्षकांनी हा अभिनव उपक्रम सुरु केलाय. शाळेच्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील मुलींना जागतिक व्यासपीठाची ओळख मिळती आहे. राज्यभरात आता या शाळेची चर्चा सुरु झाली आहे. आता दरवर्षी या शाळेत ऍडमिशन घेण्यासाठी पालकांची गर्दी होते.

इथल्या शिकक्षकांचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. सर्वच जिल्हा परिषद शाळांचा दर्जा असा सुधारला तर जिल्हा परिषद शाळांना सुगीचे दिवस येतील हे वेगळं सांगायला नको. 





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24