दादरच्या एका नावाजलेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून थेट खळबळजनक प्रकार समोर आला आहे. शाळेतील अल्पवयीन विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या शिक्षिकेने, कोर्टात धक्कादायक माहिती सादर करत प्रकरणाला नवे वळण दिले आहे.
.
शिक्षिकेच्या म्हणण्यानुसार, विद्यार्थी तिच्या प्रेमात होता, आणि दोघांत परस्पर संमतीने संबंध होते. शिक्षिकेने कोर्टात विद्यार्थ्याने लिहिलेली प्रेमपत्र आणि मोबाइलवरील चॅटिंगची स्क्रीनशॉट दाखवत जामिनासाठी अर्ज केला आहे.
‘किकी’, ‘पुकी’ म्हणत प्रेमाच नातं?
शिक्षिकेने कोर्टात दाखल केलेल्या अर्जात म्हटलं आहे, की “मी आणि तो काही काळ प्रेमसंबंधात होतो. तो मला पत्नी म्हणायचा. एवढंच नव्हे तर, ‘किकी’ आणि ‘पुकी’ अशा नावांनी तो तिला संबोधित करायचा, असे चॅट मेसेज ही सादर करण्यात आले आहेत.मात्र दुसरीकडे, विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी याआधी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, महिला शिक्षिकेने गत वर्षभरात मानसिक दबाव टाकून, दारू पाजून आणि औषधं देत शारीरिक शोषण केल्याचे म्हटले आहे.
फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये घडली होते अमानवी कृत्यं!
हा प्रकार कोणत्याही अंधाऱ्या कोपऱ्यात नव्हे, तर मुंबईतील फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये घडल्याच तपासात समोर आलं आहे. अल्पवयीन विद्यार्थ्याला शिक्षिकेने फसवून हॉटेलमध्ये नेत शारीरिक शोषण केल्याचा आरोप पालकांनी केला होता.
नेमके प्रकरण काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला ही इंग्रजी विषयाची शिक्षिका असून पीडित विद्यार्थी अकरावीत असताना शिकवत होती. डिसेंबर 2023 साली झालेल्या वार्षिक शाळेच्या कार्यक्रमासाठी नृत्य गट स्थापन करण्यात आला होता. या गटात पीडित विद्यार्थी देखील होता. याच दरम्यान शिक्षिका या विद्यार्थ्याकडे आकर्षित झाली. जानेवारी 2024 मध्ये या शिक्षिकेने या विद्यार्थ्याला लैंगिक हावभाव देखील दाखवल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पीडित मुलाला हे चांगले वाटले नाही म्हणून त्याने या शिक्षिकेला टाळण्यास सुरू केले. मुलगा आपल्याला टाळतोय असे लक्षात आल्यावर महिलेने तिच्या एका मैत्रिणीची मदत घेतली. या मैत्रिणीने मुलाला सांगितले की ती शिक्षिका आणि तू एकमेकांसाठी बनलेले आहात. त्यानंतर विद्यार्थ्याने शिक्षिकेला भेटण्याचा निर्णय घेतला. शिक्षिकेने या विद्यार्थ्याला एका निर्जन स्थळी नेते व तिथे त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले. या घटनेनंतर विद्यार्थी तणावात राहायला लागला. तणावात राहू नये म्हणून या शिक्षिकेने त्याला काही औषध देण्यासही सुरू केले, असे तपासत समोर आले.