रस्त्यांवरील भेगांमुळे वाहनधारक त्रस्त; अपघाताचा धोका वाढला – Chhatrapati Sambhajinagar News



शहरातील रस्त्यांवरील विकासकामांमध्ये नियोजनाचा अभाव दिसून येतो. एका भागातील सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम दोन ते चार ठेकेदारांना दिले जाते. एक ठेकेदाराचे काम पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्याचे काम सुरू होण्यास उशीर होतो. त्यामुळे दोन्ही कामांमध्ये समांतरता र

.

भाजी मार्केट, यशवंतनगर, तहसील रोड, नवीन कावसन, सराफ नगर, पावले गल्ली, नाथ गल्ली, गागाभट चौक, रेणुका देवी गल्ली, बसवेश्वर चौक या भागांमध्ये अशा खटक्या मोठ्या प्रमाणात दिसून येतात. या खटक्यांमुळे दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. वाहन खटक्यावर आदळल्यास चाकाची बेरिंग, शॉकअप, रिंग, टायर आणि इंजिनवर परिणाम होतो. त्यामुळे वाहन वारंवार दुरुस्त करावे लागते. वाहनधारकांच्या खिशाला चटकी बसते. बजेट कोलमडते. या खटक्यांमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही वेळा गाडी बंद पडते. अशावेळी मागून येणाऱ्या वाहनधारकाला अंदाज येत नाही. त्यामुळे समोरील वाहनावर आदळण्याचे प्रकार घडतात. शहरातील नागरिकांनी अशा खटक्यांची तातडीने योग्य दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.

भ्ेगांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले ^गेल्या अनेक वर्षांपासून शहरात ज्या ठिकाणी सिमेंट काँक्रेट रस्त्याची काम दोन टप्प्यात एकाच गल्लीतील कामे झाली. अशा प्रत्येक ठिकाणी कुठे दोन इंच तर कुठे चार इंच खटके पडले आहेत. त्यामध्ये भाजी मार्केटच्या उतार उतरल्यावर समोरच एक चार इंच ची खटकी येते या खटकीला गाडी जाऊन जोरात आढळते. त्यामुळे समोरील चाकाची बेरिंग व शॉकअप वारंवार दुरुस्त करण्याची वाहनधारकांवर वेळ येत आहे. आशा पडलेल्या खटकीमुळे महिला वाहनधारकांच्या गाड्या स्लिप होऊन पडत आहेत. -गणेश लाहोटी, व्यापारी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24