शहरात गेल्या ४ सुरू असलेली पावसाची संततधार शुक्रवारी विसावली. पाऊस सतत बरसल्याने अनेक ठिकाणी तुंबलेले पाणी ओसरले आहे. आता मंगळवारपर्यंत काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाच्या नागपूर येथे प्रादेशिक विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे जिल्ह्याती
.
जून महिन्याच्या प्रारंभी फारसा पाऊस पडला नाही. मृग नक्षत्रात पावसाने पाठ फिरवल्याने अनेकांची चिंता वाढली. मात्र जूनच्या अखेरीस दोन वेळा तुफान पाऊस झाला. परिणामी महिना संपला तेव्हा १५५.८ मि.मी. पावसाची नोंद झाली. हा पाऊस सरासरीच्या ११३.८ टक्के होता. गतवर्षी जून महिन्यात हेच प्रमाण १३९ मिमी (सरासरीच्या १०१.५ टक्के) होते. जून महिन्यात जिल्ह्यात १३६.९ मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित होते. त्यानंतर जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. त्यानंतर मात्र दुसऱ्या आठवड्यात चार दिवस संततधार पाऊस सुरू होता.