महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट पुन्हा एकदा वादात अडकले आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ हँडलवरून त्यांचा एक व्हिडिओ शेअर केला. या व्हायरल व्हिडिओमध्ये शिरसाट बेडवर बसून सिगारेट ओढत
.
ते म्हणाले, बेडरूममध्ये मी बसलेले आहे. बाजूला माझा सर्वात लाडका कुत्रा आहे. व्हिडिओबद्दल मला आश्चर्य नाही, यात काही गैर नाही, टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. एक बॅग ठेवलेली आहे. एवढी मोठी बॅग जर पैशांची असेल तर अलमाऱ्या काय मेल्यात का? मंत्री शिरसाट यांनी उर्वरित. पान ८
शिरसाट यांची मालमत्ता ५ वर्षांत १३ पट वाढली; नाेटीसही मिळाली
काही दिवसांपूर्वीच शिरसाटांना आयकर विभागाची नोटीसही मिळाली होती. ५ वर्षांत त्यांच्या मालमत्तेत १३ पट वाढ झाल्याचा आरोप आहे. २०१९ मध्ये शिरसाटांनी विधानसभा निवडणुकीवेळी २.४५ कोटी रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता जाहीर केली. परंतु २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी एकूण ३२.९२ कोटींची मालमत्ता जाहीर केली. शिरसाट यांच्या मुलाने अलीकडेच संभाजीनगरातील हॉटेल व्हिट्स ६८ कोटी रुपयांत खरेदी करण्याचा प्रयत्न केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. यामुळे शिरसाटांचे मंत्रिपदही धोक्यात आले होते.
शिरसाटांच्या दाव्यांवर दमानियांचा पलटवार
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या, शिरसाटांच्या दाव्यांवर मला आश्चर्य वाटते. बॅगेत नोटा स्पष्ट दिसत आहेत, तरी ते कपडे आहेत असा दावा कसा करू शकतात? मी व्हायरल व्हिडिओ बारकाईने पाहिला आहे.
विश्वासघात करणाऱ्यांनी ५० खोके घेतले : आदित्य
ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे म्हणाले की, शिवसेनेचा विश्वासघात करणाऱ्या आणि पक्ष सोडून गेलेल्यांवर आम्ही आधीच ५० खोके घेतल्याचा आरोप करत होतो. मंत्री शिरसाटांनी घेतलेल्या ५० खोक्यांपैकी हा एक खोका आहे.
बॅगेत पैसे नव्हे, कपडे दिसत आहेत : शिरसाट
नोटांची बंडले असलेल्या बॅगवरून माध्यमांमध्ये उलटसुलट चर्चेला सुरुवात होताच मंत्री शिरसाट यांनी स्वतःहून या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. त्या बॅगेत नोटा नव्हे तर कपडे दिसत असल्याचा दावा त्यांनी केला.
मंत्रिमहोदय पुन्हा अडचणीत
माजी खासदार इम्तियाज जलील यांनी शिरसाटांवर जबिंदा बिल्डरकडून १२००० स्क्वेअर फुटांचा प्लॉट फक्त ४८०० प्रति प्रति स्क्वेअर फुटाने घेतल्याचा आरोप केला होता. तर मुलगा सिद्धांत यांनी व्हिट्स ६७ कोटींत खरेदीचा प्रयत्न केला होता. आता शिरसाट बेडरूममध्ये नोटांची बंडले असलेल्या बॅगसोबत दिसताहेत.